Young Inspirers Network  Dainik gomantak
गोवा

'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' आयोजित निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे गोव्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमन्तक आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे गोव्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ''गोव्यातील नव्या मुख्यमंत्र्यांकडून तुमची अपेक्षा'', ''युवकांच्या दृष्टीने गोव्यातील मूलभूत प्रश्न आणि उपाय'', ''गोव्याचे बदलते राजकारण व नवीन पक्षांचे आगमन'', ''राजकीय घराणेशाही'' या विषयांवर सदर निबंध स्पर्धा होती.

निबंधांचे परीक्षण गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि वालावलकर शाळेचे माजी प्राचार्य आणि लेखक अनिल सामंत यांनी केले.

पहिल्या तीन क्रमांकाचे निबंध दैनिक ‘गोमन्तक’मध्ये प्रकाशित करण्यात आले. मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले कॉलेजच्या अपूर्वा प्रदीप दामले हिचा पहिला, तर गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. दादा वैद्य महाविद्यालयाच्या निकिता आईर हिचा दुसरा तर फर्मागुढीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निकेश वासुगावकर याचा तिसरा क्रमांक आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT