Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Skoda Car Accident: अमली पदार्थाच्या नशेत असणाऱ्या स्कॉडा चालकांची तीन दुचाकींना धडक; एकजण जागीच ठार

Drugged Driver Hits Motorbikes: पेड्डामळ येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यात दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Pramod Yadav

Goa Accident

केपे: पेड्डामळ येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. स्कॉडा चारचाकी चालकाने तीन दुचाकींना धडक दिल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला.

यात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चारचाकी चालक अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अब्दुल कादर बादशाह असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सुफियान शेख असे यात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पेड्डामळ येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यात दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, यावेळी स्थानिकांनी देखील मोठी गर्दी यावेळी केली होती.

कार चालक अमली पदार्थाच्या नशेत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. चारचाकीत अमली पदार्थाच्या पुड्या देखील आढळून आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला. दरम्यान, ही घटना हिट अँड रनची आहे, असा दावा करत गुन्हा दाखल करण्याची व चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी पेड्डामळ स्थानिकांनी केली. यावेळी परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

SCROLL FOR NEXT