Goa-Ahmedabad Flight Bomb Threat: गोवा - अहमदाबाद फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; लँड होताच प्रवाशांची उडाली भंबेरी

Goa Ahmedabad Flight: विमान लँड झाल्यानंतर रनवेवरच त्याला थांबविण्यात आले. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला.
Indigo Flight
Indigo FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Ahmedabad News: विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुमारे २४ भारतीय विमानांना मिळाली. यात गोवा - अहमदाबाद फ्लाईटचा देखील समावेश होता. रविवारी गोव्यातून अहमदाबादमध्ये लँड झालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर प्रवाशांची भंबेरी उडाली.

पोलिस, सुरक्षा यंत्रणातील जवानांनी विमान आणि प्रवाशांची पाहणी केल्यानंतर बॉम्बची धमकी अफवा असल्याचे समोर आले.

इंडिगोच्या 6E112 या गोवा -अहमदाबाद विमानाने गोव्यातून वेळेत उड्डाण घेतले, विमान १ वाजून ०८ मिनिटांनी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लँड झाले. विमान लँड झाल्यानंतर रनवेवरच त्याला थांबविण्यात आले. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला.

यानंतर पायलटने विमानात सुरक्षा संबधित अलर्ट देत, सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. यानंतर काही वेळातच सुरक्षा यंत्राणाच्या जवानांनी विमानाला घेरले.

प्रवाशांना विमानातच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विमानतळावर २५ ते ३० कमांडो, स्निफर डॉग्ज आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच, बॉम्ब पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.

Indigo Flight
Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

सुरक्षा यंत्रणातील जवानांनी एक - एक करत प्रवाशांना खाली उतरवले, यावेळी प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासण्यात आले. विमानाची देखील कसून तपासणी करण्यात आली.

प्रवाशांना विमानातून खाली उतरवल्यानंतर शेजारील बसमध्ये बसवून त्यांना टर्मिनलवर सोडण्यात आले. यावेळी इतर अनेक फ्लाईटच्या उड्डाणांना विलंब झाला.

अखेर तपासणीनंतर ही बॉम्बची धमकी अफवा असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, सुरक्षात्मक धमकी आणि तपासणीमुळे प्रवाशांचा तीन तास खोळंबा झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com