Link Road Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रस्त्याच्या कामाला गती

सहा पदरी रस्ता: साडे सहा किलोमीटर लांबी, झाडे कापली

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा विमानतळासाठी सुकेकुळण धारगळ ते मोपा विमानतळ प्रकल्पापर्यंत साडेसहा किलो मीटर लांबी आणि सहा पदरी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विरोधात दोन याचिका असूनही काम बंद न ठेवता सुरूच ठेवण्यात आले असून झाडेही कापली जात आहेत.

मोपा पीडित शेतकऱ्यांनी जी सरकारने जागा संपादित करण्याची प्रक्रिया केलेली आहे, त्या प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी न्यायालयात याचिका सादर सादर केलेले आहेत.

त्याची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार तर दुसऱ्या बाजूने वारखंड पंचायतीने लिंक रस्त्यासाठी जी झाडे तोडली जाता आहेत. ते काम बंद ठेवण्याचा आदेश देणारी नोटीस अशोका बिल्डर कंपनीला पंचायतीने दिली होती. त्या नोटीसला आव्हान देण्यासाठी कंपनीने पंचायत संचालनालयाकडे अर्ज दाखल केला आणि त्या नोटीसला स्थगिती देण्यात आल्यानंतर त्याची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. या दोन्ही याचिकांची सुनावणी आणि निकाल लागेपर्यंत निदान काम तरी बंद ठेवावे, अशी मागणी होती. परंतु कंपनीने या मागणीचे मागणीला दुर्लक्ष करत उर्वरित जी काही झाडे होती, ती सोमवारी पोलिसांच्या उपस्थितीत झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली.

मोपा लिंक रस्त्यासाठी आडवी येणारी झाडे होती, ती झाडे पूर्णपणे कापून टाकण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन करताना सरकारने नियमानुसार झाडे कापली नसल्याच्या तक्रारी काही पीडित शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. मोपा पीडित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आणि बागायतीतील झाडे बेकायदा कापली जातात, त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. जमीन संपादन केलेली प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या नियमाला धरून असल्याचा दावा करत काही शेतकऱ्यांनी याचिका सादर केली होती. त्यावर मागच्या चार दिवसापूर्वी सुनावणी होऊन पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

SCROLL FOR NEXT