Varca Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: रंगहीन गतिरोधक ठरला तरुणीच्‍या मृत्‍यूस कारण

Goa Accident Death: धारबांदोडा येथे दुचाकी अपघात : तरुण जखमी, उपचार सुरू

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: प्रवासादरम्‍यान गतिरोधकावर दुचाकी उसळल्‍याने रस्‍त्‍यावर पडून निफा फर्नांडिस (वय 26, रा. रिवण) ही तरुणी गंभीर जखमी झाली. उपचारांसाठी इस्‍पितळात नेत असताना तिचा मृत्‍यू झाला. हा अपघात आज (सोमवार) रात्री आठ वाजण्‍याच्या सुमारास धारबांदोडा येथे झाला.

दुचाकीचालक जॉली फर्नांडिस (२६, रा. उगे) जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. निफा व जॉली हे दोघेही उसगाव येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी दुचाकीवरून आले होते. घरी परतताना धारबांदोडा येथे मामलेदार कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी उसळली.

नागरिक रास्ता रोको करणार

धारबांदोडा येथे ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथे आत्तापर्यंत अनेक बळी गेले आहेत. रस्त्यावर उभारण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टेही नाहीत. त्यामुळे गतिरोधकाचा अंदाज येत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक संतप्त झाले असून, मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT