Goa Railway Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील भक्तांसाठी वालंकिणीच्या दर्शनासाठी 7 मार्चपासून खास गाड्या

गोव्यातील भक्तांना दक्षिण - पश्चिम रेल्वेतर्फे रेल्वे प्रवासाची सोय करण्यात आली

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: तमिळनाडू येथील असलेल्या अवर लेडी ऑफ वालंकिणी सायबीणीच्या भेटीसाठी गोव्यातील भक्तांना दक्षिण - पश्चिम रेल्वेतर्फे रेल्वे प्रवासाची सोय करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याची सुरवात 7 मार्चपासून होणार असून रेल्वे क्रमांक 17315 वास्को रेल्वे स्टेशनवरून सकाळी 9 वाजता सुटणार आहे आणि यानंतर मडगाव, लोंढा, हुबळी, बन्सवाडी, करुर, तिरुवरूर, नागपटनमसहत 24 रेल्वे स्थानकावर थांबा घेऊन दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता वालंकिणी या ठिकाणी पोचणार आहे.

रेल्वे क्रमांक 17316 ही वालंकिणी येथील रेल्वे स्थानकावरून दर गुरुवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 3.25 वाजता वास्को येथील रेल्वे स्थानकावर या ट्रेनचे आगमन होणार आहे. याची सुरवात 8 मार्चपासून होणार आहे. या रेल्वेला 2 टायर एसीचा 1 डबा, 3 टायर ए सीचे 4 डबे, स्लिपरचे 7 डबे व इतर मिळून एकंदरीत 18 डबे या रेल्वेला जोडण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT