Pope Francis Dainik Gomantak
गोवा

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांच्या स्मरणार्थ से कॅथेड्रल चर्चमध्ये प्रार्थनेच आयोजन

Pope Francis Tribute Goa: पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी (२१ एप्रिल) निधन झालं. त्यांच्या निधनामुळे जगभरातील संपूर्ण ख्रिस्ती धर्मीय समुदायाकडून शोक व्यक्त केला जात आहे.

Sameer Amunekar

पणजी: पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी (२१ एप्रिल) निधन झालं. त्यांच्या निधनामुळे जगभरातील संपूर्ण ख्रिस्ती धर्मीय समुदायाकडून शोक व्यक्त केला जात आहे. गोव्यातील ख्रिस्ती बांधवांकडूनही हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या स्मरणार्थ गोव्यातील ऐतिहासिक से कॅथेड्रल चर्च, जुना गोवा येथे गुरुवारी (२४ एप्रिल) प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे.

गोवा चर्चनं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सदर प्रार्थना सभा सकाळी ९ वाजता आयोजित केली जाईल. या स्मृतिपूजेला गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव हे अध्यक्षस्थानी असतील.

या वेळी राज्यातील विविध ख्रिस्ती संघटना, धार्मिक संस्था तसंच सर्वसामान्य नागरीकांनी देखील चर्चमध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन चर्च प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी म्हणजेच शनिवार २६ एप्रिल रोजी बिशप हाऊसमधील सर्व कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचंही चर्चच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या सन्मानार्थ संपूर्ण भारतात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. मंगळवार (२२ एप्रिल) आणि बुधवार (२३ एप्रिल) २०२५ रोजी आणि अंत्यसंस्काराच्या दिवशी एक दिवसाचा राज्य शोक असेल.

पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिलला निधन झालं. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांच्यावर शनिवारी (२६ एप्रिल) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT