Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

Delilah Lobo: गोवा राज्य चित्रपट महोत्सव मागील काही वर्षांपासून आयोजित करण्यात आला नव्हता. शेवटची नववी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. यंदा राज्य महोत्सवाच्या दहाव्या, अकराव्या आणि बाराव्या आवृत्तीचे आयोजन मार्चमध्ये करण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2024 Special Masterclasses for Filmmakers and Artists

गोमंतकीय कलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील अनेक वर्षे गोव्यात इफ्फीचे आयोजन केले जातेय, परंतु अजूनही येथे चित्रपट संस्कृती रूजलेली नाही. तोडीस तोड चित्रपट तयार होत नाहीत. त्यामुळे राज्यातील सिनेनिर्माते, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खास मास्टर क्लास २५ ते २७ नोव्हेंबर यादरम्यान झेड स्क्वेअर, पणजी येथे आयोजित करण्यात आले आहेत.

त्याचा गोमंतकीयांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो यांनी केले. संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्या.

गोवा राज्य चित्रपट महोत्सव मागील काही वर्षांपासून आयोजित करण्यात आला नव्हता. शेवटची नववी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. यंदा राज्य महोत्सवाच्या दहाव्या, अकराव्या आणि बाराव्या आवृत्तीचे आयोजन मार्चमध्ये करण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

दिग्गज करणार मार्गदर्शन

राज्यातील कलाकार निर्मात्यांना आपली चांगली संहिता (स्क्रिप्ट) कशा प्रकारे एखाद्यासमोर प्रस्तुत करावी यासंबंधी २५ नोव्हेंबर रोजी झी स्टुडिओचे सीईओ शारिक पटेल मार्गदर्शन करतील. निर्मितीसंबंधी रोहन सिप्पी मार्गदर्शन करणार आहेत. २६ रोजी स्क्रिनप्ले आणि स्क्रिप्टबाबत नीरेन भट्ट तर २७ रोजी दिगदर्शनासंबंधी प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश कृष्णन मार्गदर्शन करणार आहेत.

चित्रपट अर्थसाहाय्य योजना

गोवा मनोरंजन सोसायटीच्या चित्रपट अर्थसाहाय्य योजना २०१६ मध्‍ये सुरवात करण्यात आली. या योजनेचे अर्ज आमच्या संकेतस्थळावर ९ डिसेंबर ते १८ जानेवरी २०२५ पर्यंत उपलब्ध असतील. ते अर्ज योग्य कागपत्रांसहित २१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत असे आवाहन कार्यकारी सभासद शर्मद पै रायतूकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT