आकाशवाणीचे निवृत्त निवेदक रामानंद जोशी आशालता ताईंच्या (Ashalata Wabgaonkar) प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना व इतर मान्यवर Dainik Gomantak
गोवा

आशालता वाबगावकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी काणकोणात विशेष कार्यक्रम

आशालता ताईच्या जीवनावर आधारित निबंध व वाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकार आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांच्या पहिल्या स्मृतीदिनी (1st Death Anniversary) काणकोणात आज बुधवार (ता.२२) रोजी चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या (Shri Mallikarjun Vidyalay) सभागृहात काणकोण (Canacona) कलाकार संघातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे होते. आकाशवाणीचे निवृत्त निवेदक रामानंद जोशी (Retired AIR Presenter Ramanand Joshi) यांच्याहस्ते आशालताा ताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आशालता ताईच्या जीवनचरित्रावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध व वाचन स्पर्धेत श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या प्रगती नाईक, अपेक्षा गजानन बोळणेकर,विधीता दत्ता कोमरपंत,मनस्वी मारूती; गवळखोला शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या वंश पागी; तुडल हायस्कूलच्या सना गोविंद गावकर; निराकार विद्यालयाच्या सौम्या प्रभू अग्रासनी; श्रद्धानंद विद्यालयाच्या भार्गवी राजेश पै; बलराम डे केअर शाळेच्या श्रेया दिनकर मेस्त्री, समृद्धी संजय कोमरपंत; आंगले हायर सेकंडरीच्या अश्विता वेळीप; बलराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्वरांगी नाईक; सादोळशे शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या रीमा नारायण कोमरपंत व गुरूकुलच्या संजना वेळीप यांनी निबंधाचे वाचन केले. जेष्ठ लोककला अभ्यासक कमलाकर म्हाळशी यांनी आशालता ताईंच्या गर्द सभोवती या पुस्तकावर भाष्य केले. त्याशिवाय विकास देसाई, धिल्लन देसाई, अजित पैंगीणकर व कलाकार संघाचे अध्यक्ष अनिल फळ देसाई यावेळी आशालताई विषयी आपल्या भावना व्यक्त करताना आशालता ताई चतुरस्त्र कलाकार होत्या, त्याच्या कार्यातून काणकोण मधील आजच्या तरूण पिढीने आदर्श घ्यावा हा या कार्यक्रमामागील हेतू असल्याचे रामानंद जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाला राजेंद्र देसाई, तालुका सुकाणू समितीच्या अध्यक्षा मीना कामत उपस्थित होत्या.

आशालता वाबगावकर पाळोळे येथील सुकन्या असून त्यांनी चित्रपट,मराठी संगीत नाटके, दूरचित्रवाणी,मालिका यामध्ये विविध भुमिका साकारल्या.त्या उत्कृष्ट गायिका होत्या.त्याच्या कार्याची व जीवन चरित्राचा परिचय युवा पिढीला व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघाचे अध्यक्ष अनिल फळ देसाई यांनी सांगितले.काणकोण तालुक्यावर त्याचे निस्सीम प्रेम होते त्याचसाठी येथील धार्मिक कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित राहत.पुंडलिक नायक यांच्या देखणी दुराय या चित्रपटात प्रमुख भुमिका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT