पर्ये - गोव्यातून (Goa) बेळगावला (Belgaum) जाणाऱ्या चोर्ला घाट मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून आज( बुधवारी) पहाटे गोवा-कर्नाटक सीमा परिसरातील गोव्याच्या हद्दीत मालवाहू ट्रक( KA 01 D 8670) कलंडल्याने अपघात (Accident) झाला. बेळगाव भागातून गुरांसाठी कडबा( गवत) घेऊन येणाऱ्या ट्रकचा तोल गेल्याने हा अपघात झाला आहे. अपघातून ट्रकचे मोठे नुकसान झाले. त्यात त्याच्या दर्शनी भागाच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहे पण सुदैवाने ट्रक चालक शिवकुमार नालगुडी( 30) व क्लीनर शिवाप्पा हिंचल याना किरकोळ जखम झाली. हा अपघात रस्त्याच्या उतारावर झाला.
दरम्यान चोर्ला घाट धोकादायक बनत चालला असून या मार्गावर नियमितपणे अपघात होत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी असाच एक ट्रक कलंडला होता त्यात ट्रकची मोठी हानी झाली होती तर पंधरा दिवसापूर्वी असाच एक ट्रक रस्त्या बाजूला झुकलेला होता.
पावसाळ्यात चोर्ला घाट वाहतुकीस धोकादायक असतो. रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. तसेच रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहतूक वाढलेली असल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक बनतो
दरम्यान उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानी या मार्गावरील 31 डिसेंबर 2021 पर्यंत अवजड व अतिअवजड वाहतूक बंदीचा आदेश दिला असताना या मार्गावरून राजरोसपणे अशी वाहतूक सुरू आहे. रात्रीच्या वेळी अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने असे हे अपघात रात्रीच्या वेळी होत आहे.
पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळून इथला रस्त्यावरील वाहतूक बंद होणे आणि रस्ता धोकादायक बनण्याचे प्रकार घडत असताना आता यावर अपघाताचे सत्र सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतुकदारांनी काळजी घेण्याचे संकेत आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.