डिचोली (Goa): राजकारणासह स्व. हरिष झांट्ये (Late Harish Zantye) यांचे शिक्षण, सहकार आदी सामाजिक क्षेत्रातील योगदान विस्मृतीत न जाण्यासारखे आहे. असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Bicholim MLA & Speaker Rajesh Patnekar) यांनी केले. माजी मंत्री, माजी खासदार आणि मयेचे माजी आमदार हरिष (अण्णा) झांट्ये यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली (Tribute) वाहताना सभापती पाटणेकर बोलत होते. डिचोली येथे बुधवारी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, स्व. अण्णा झांट्ये यांचे पूत्र आणि मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, मयेच्या प्रभारी प्रा. सुलक्षणा सावंत, भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद महांबरे, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे पंच विश्वास चोडणकर, ऊर्वी मसुरकर, डॉ. एन. सी. सावंत आदी उपस्थित होते. याप्रसंगी सदानंद तानावडे, शंभू भाऊ बांदेकर, प्रा. सुलक्षणा सावंत आदींनी आपल्या भाषणातून अण्णा झांट्ये यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून अडल्यानडलेल्यांना अण्णा झांट्ये यांच्याकडून सदैव मदतीचा हात मिळत होता. यावर प्रकाश टाकला.
प्रवीण झांट्ये यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून स्व. अण्णा झांट्ये यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास स्व. अण्णा झांट्ये यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.