Ramakrishna Jalmi and Surel Tilve Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खटले निराकरणासाठी विशेष न्‍यायालये आवश्‍यक

‘सडेतोड’ चर्चा : ‘कुळ-मुंडकार कायद्याच्या विटंबने’वर तज्ज्ञांचे मत

दैनिक गोमन्तक

पणजी : केवळ आश्‍वासने देऊन कुळ-मुंडकारांचे प्रश्‍न व समस्याही संपणार नाहीत. त्यांचा खरोखरच कळवळा असेल तर सरकारने यातील जाचक तरतुदी रद्द करून 1964 च्‍या कायद्याची अंमलबजावणी करावी, असा सूर गोंयच्‍या कुळ-मुंडकारांचो आवाज संघटनेचे नेते रामकृष्ण जल्‍मी, प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सुरेल तिळवे यांनी व्यक्त केला. (special court in goa)

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ‘कुळ-मुंडकार कायद्याची घुसमट’ या विषयावर संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांच्‍याशी चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच कुळ शेतकऱ्यांच्‍या नावावर संबंधित जमिनी करणार, अशी घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर आयोजित चर्चेत मान्‍यवरांनी भूमिका मांडली. कुळ-मुंडकारांचे सुमारे 5 हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत.

कुळ-मुंडकार कायदा होऊन जवळजवळ 57 वर्षे झाली, तरीही हा प्रश्‍न का सुटत नाही, असा सवाल नायक यांनी केला असता रामकृष्ण जल्‍मी म्‍हणाले, देशात भूदान चळवळ झाली, त्‍यावेळी कसेल त्‍याची जमिन आणि राहिल त्‍याचे घर हा कायदा अस्‍तित्‍वात आला. तर 1964 मध्ये गोव्‍याचे तत्‍कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ-मुंडकार कायदा केला. कायद्यानुसार मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी यांनी प्रत्‍यक्ष जाऊन सर्वे करणे अपेक्षित होते. पण काही अपवाद वगळता तसे झाले नाही. लोकही मामलेदारांपर्यंत गेले नाहीत. त्यामुळे विषय प्रलंबित राहिला.

मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा स्वागतार्ह असली तरी सरकारने 1964 च्‍या कायद्याची अंमलबजावणी करावी, 2016 मधील जाचक तरतुदी तातडीने रद्द कराव्‍यात, त्याचबरोबर खटल्‍यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी विशेष मामलेदार, उपजिल्हाधिकारी नेमावेत, अशी मागणी जल्मी यांनी केली; तर खटले तातडीने निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष मामलेदार, विशेष उपजिल्‍हाधिकारी आणि विशेष न्‍यायालये नेमणे आवश्‍यक असल्‍याचे ॲड. तिळवे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT