Vasco News Dainik Gomantak
गोवा

Vasco News: वाढते अपघात रोखण्यासाठी वास्को पोलीसांनी राबवलीय 'ही' विशेष मोहीम

मोहिमेदरम्यान कोणतेही चलन जारी करण्यात आले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News आज वास्को पोलिसांनी हेल्मेट घालण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली. मोहिमेदरम्यान लोकांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि त्यांना हेल्मेट कसे घालावे हे देखील सांगण्यात आले. मोहिमेदरम्यान कोणतेही चलन जारी करण्यात आले नाही.

राज्यात वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागामार्फत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. सरकार प्रत्येक पोलिस स्थानकां तर्फे जनजागृती मोहीमे अंतर्गत, वाहतुकीचे नियम पाळण्याचे वाहन चालकांना आवाहन करीत आहे.

यासाठी सर्वसामान्य जनतेने आपले कर्तव्य पार पडताना राज्य सरकारच्या वाहतुक सुरक्षेसाठी, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचा सल्ला वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी दिला.

वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि.९) पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक व इतर पोलिसांनी मिळून वास्को शहरात वाहतुक नियमांची जनजागृती केली.

यावेळी उपनिरीक्षक नाईक यांनी दुचाकी चालकांना हेल्मेटचा उपयोग करण्याचे आवाहन केले. प्रत्येक दुचाकी चालकांने हेल्मेट आपल्या डोक्यावर परिधान करून घरातून बाहेर पडावे.

तसेच चारचाकी चालकांने वाहन चालवताना सीटबेल्टचा उपयोग करण्याचे आवाहन उपनिरीक्षक नाईक यांनी करून वाहन चालवताना मोबाईल फोनचा उपयोग करण्याचे टाळावे.

कारण आपणच वाहतुकीचे नियम पाळू शकतो. यासाठी प्रत्येकांनी आपल्या कुटूंबासाठी वाहतुकीची सुरक्षा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

Birsa Munda Jayanti 2024: गोमंतकात ‘धरती अबा’चा पुतळा हवाच, तोही भव्य दिव्य...

Goa Land Policy: राज्यात भू-रुपांतर सुरुच! 32 भूखंडांच्या विभाग बदलास नगररविकास खात्याची मान्यता

Goa Live Updates: सुखी, समाधानी, समृद्ध गोवेकर हेच आमचे ध्येय!

Goa Kartik Purnima: गोव्यात मंदिरांसमोरील दीपमाळची परंपरा कधी पासून?

SCROLL FOR NEXT