Ramesh Tawadkar | Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सभापती रमेश तवडकर होणार मंत्री, गोविंद गावडेंना बाहेरचा रस्ता; राजकीय घडामोडींना वेग

Goa Cabinet Reshuffle: अनेक दिवसांपासून रखडलेला गोवा मंत्रिमंडळाच्या फेरबदलास भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे.

Pramod Yadav

पणजी: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे. मंत्री गावडे यांना बाहेरचा रस्ता दाखवून सभापती रमेश तवडकरांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

फोंडा येथील प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्याबाबत आणि भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावरुन मंत्री गोविंद गावडे वादाच्या भोवऱ्यात सापडले. गावडेंच्या वक्तव्याची गंभीर दखल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घेतली.

गावडेनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्या कारवाईचे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले. यानंतर गावडेंनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत सर्व खापर माध्यमांवर फोडले.

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी आपण चर्चा केल्याचे सांगत ते चांगले मित्र असल्याचे उद्गार त्यांनी काढले. दरम्यान, गावडे यांना आज (२९ मे) त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुसाला देण्यासाठी भाजप कार्यालयात पाचारण करण्यात आले आहे.

यानंतर होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत गावडे यांच्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर रस्ता दाखवण्यात आल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, त्यांच्या जागी सभापती रमेश तवडकरांची वर्णी लागणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलास हिरवा कंदील!

अनेक दिवसांपासून रखडलेला गोवा मंत्रिमंडळाच्या फेरबदलास भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोमन्तक टीव्हीला माहिती दिली आहे. त्यामुळे गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी जवळपास निश्चित मानली जात आहे.

दामू नाईक आणि मुख्यमंत्री सावंत यांनी कारवाईचा इशारा दिल्याने मंत्री गावडे यांच्यावर निश्चित कारवाई होणार अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायेत. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री सावंत यांच्यावर वक्तव्य केल्याने यांची पक्षाने स्थानिक आणि दिल्लीत देखील दखल घेतली आहे.

दुसरीकडे उटा या आदिवासी संघटनेचे नेते प्रकाश वेळीप यांनी गावडेंना समर्थन दिले आहे. तसेच, गावडेंच्या समर्थनात सोशल मिडियावर कॅम्पेन सुरु झाले आहे. गावडेंना मंत्रिमंडळातून हटविल्यास गोव्यात वणवा पेटेल, असा इशारा या कॅम्पेनमधून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खूर्च्या उचण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

SCROLL FOR NEXT