Goa Zilla Panchayat Presidents|Sadanand Tanavade  Dainik Gomantak
गोवा

Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत नव्या चेहऱ्यांचीच निवड; लोकांची कामे मार्गी लावणार असे तानावडेंचे आश्वासन

Goa Zilla Panchayat: उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष यांना तानावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून लोकांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. यामुळे जिल्हा पंचायतीच्या येत्या निवडणुकीत भाजपचेच कार्यकर्ते पुन्हा विजयी होतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज भाजपच्या कार्यालयात झालेल्या गौरव समारंभात व्यक्त केला.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेले शंकर चोडणकर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या संजना वेळीप यांना तानावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तानावडे म्हणाले, पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार या निवडी झाल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केले तेव्हाच या निवडी बिनविरोध होणार हे ठरून गेलेले होते. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्षाचा आदेश माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांसाठी बंधनकारक आहे. भाजप कार्यालयात येण्यापूर्वी दोन्ही नव्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सत्ताधारी गटातील जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

‘नागरिकांच्या हिताच्या कामांना प्राधान्य’

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीतील सर्व सदस्यांना विश्र्वासात घेऊनच काम करणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या हिताच्या कामांना प्राधान्य देणार आहे, असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर संजना वेळीप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT