Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: भटक्‍या कुत्र्यांच्‍या बंदोबस्‍ताची जबाबदारी 'दृष्‍टी'कडे द्या! द. गोव्‍यातील सरपंचांची पर्यटन संचालकांकडे मागणी

Drishti stray dog management Goa: भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्‍त पंचायती करू शकत नाहीत. त्‍यामुळे ही जबाबदारी पर्यटन खात्‍याने नेमलेल्‍या ‘दृष्‍टी’ संस्‍थेकडे द्यावी.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्‍त पंचायती करू शकत नाहीत. त्‍यामुळे ही जबाबदारी पर्यटन खात्‍याने नेमलेल्‍या ‘दृष्‍टी’ संस्‍थेकडे द्यावी, अशी मागणी आपण पर्यटन संचालक केदार नाईक यांच्‍याकडे केली असून, त्‍यांनी याबाबत सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍याची माहिती केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी दिली.

किनारी भागांतील भटक्‍या कुत्र्यांच्‍या बंदोबस्‍तासंदर्भात दक्षिण गोव्‍यातील सरपंचांची केदार नाईक यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर वाझ पत्रकारांशी बोलत होते. गोमंतकीयांची अर्थव्‍यवस्‍था पर्यटनावर अवलंबून आहे. अशा स्‍थितीत किनारी भागांत वाढत असलेली भटकी कुत्री तेथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे चावे घेत आहेत.

त्‍यामुळे गोव्‍याची बदनामी होत असून, पर्यटकांची संख्‍याही रोडावण्‍याची शक्‍यता आहे. तसे झाल्‍यास त्‍याचा फटका पर्यटनावर अवलंबून असलेल्‍यांना बसणार आहे. त्‍यामुळे अशा कुत्र्यांच्‍या बंदोबस्‍ताची जबाबदारी पर्यटन खात्‍याने ‘दृष्‍टी’वर द्यावी तसेच किनारे स्‍वच्‍छतेसाठी नेमलेल्‍या कामगारांनाही त्‍याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आपण नाईक यांच्‍याकडे केली असून, त्‍यांनी त्‍यासाठी सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे, असे वाझ म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT