MP Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha: पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्की लढणार; पण ही माझी शेवटची निवडणूक असेल

दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे मत

गोमंतक ऑनलाईन टीम

MP Francisco Sardinha on contesting Loksabha Election 2024: जर पक्षाने उमेदवारी दिली तर आगामी लोकसभा निवडणूक नक्की लढवणार, असा विश्वास दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात लोकसभेचे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन मतदारसंघ आहेत. पैकी गत लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक विजयी झाले होते तर दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन विजयी झाले होते.

दरम्यान, गेल्या काही काळात भाजपने दक्षिण गोव्यातील जागा देखील जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोंड्यात सभा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.

त्यावर आता दक्षिण गोव्याचे विद्यमान काँग्रेस खासदार सार्दिन यांनी मत व्यक्त केले आहे. सार्दिन म्हणाले की, पक्षाने तिकीट दिले तर मी नक्की निवडणूक लढवणार. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी ही निवडणूक लढवावी.

तथापि, ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असेल, असेही सार्दिन म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

SCROLL FOR NEXT