Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: सावधान! गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घरे होताहेत 'टार्गेट'; म्हापसा, कोलवा परिसरात दहशत

Goa Theft News: ऐन गणेशोत्‍सवाच्‍या धामधुमीत राज्‍यात चोरटे सक्रिय झाले असून दक्षिण गोव्‍यातील मुगाळी आणि उत्तर गोव्‍यातील म्‍हापसा परिसरात रविवारी चोऱ्यांच्‍या दोन घटना घडल्या.

Sameer Panditrao

पणजी: ऐन गणेशोत्‍सवाच्‍या धामधुमीत राज्‍यात चोरटे सक्रिय झाले असून दक्षिण गोव्‍यातील मुगाळी आणि उत्तर गोव्‍यातील म्‍हापसा परिसरात रविवारी चोऱ्यांच्‍या दोन घटना घडल्या, तर कोलवा परिसरात आठवडाभरात चार घरफोड्या झाल्‍या आहेत.

परिणामी दोन्‍ही जिल्‍ह्यांतील पोलिस सतर्क झाले आहेत. मुगाळी व म्‍हापशातील घटनांमध्‍ये सुमारे १.२० लाखांची रोख रक्कम आणि इतर काही वस्‍तू चोरट्यांनी लंपास केल्‍या.

त्‍यात म्‍हापशातील रबर स्टॅम्प दुकान चोरट्यांनी भर दिवसा फोडल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्‍यात आली आहे. दक्षिण गोव्‍यात गेल्‍या काही दिवसांत चोरीच्‍या काही छोट्या–मोठ्या घटना घडल्‍या असून आमदार व्‍हिएगस यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

पोलिसांनी गस्‍त वाढवावी, अशी मागणीही होऊ लागली आहे. दरम्यान, गणेशचतुर्थीच्या काळात राज्यात दरवर्षी चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने यावर्षी पोलिस खात्याने विशेष काळजी घेत विविध ठिकाणी गस्त वाढविली असली, तरी गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत चोरट्यांकडून काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

गणेशोत्सवाची साधली संधी

गणेशोत्सवाची संधी साधून मुगाळी येथील आपल्‍या घरात चोरट्यांनी घुसून २७ ते २९ ऑगस्‍टच्‍या दरम्‍यान रोख ५० हजार रुपयांसह सोन्याचे व चांदीचे दागिने पळवल्‍याची तक्रार हिरू गावस यांनी रविवारी मायणा–कुडतरी पोलिस स्‍थानकात दाखल केली. त्‍यांच्‍या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३३९ (३) व ३३१ (४) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

दगडाने कुलूप फोडले; सीसीटीव्‍हीद्वारे पकडले

१.म्‍हापसा येथील वामन सदन इमारतीतील सेलटाऊन रबर स्टॅम्प दुकान चोरट्याने रविवारी सकाळी फोडले आणि दुकानातील रोख ६० हजार रुपये, फ्लॅश मशीन व इतर वस्तू लंपास केल्‍या.

२.या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी महादेव गोसावी (२५, म्हापसा व मूळ हुबळी - कर्नाटक) या संशयिताला अटक केली.

३. त्‍याच्‍याकडून चोरीला गेलेली ६० हजारांची रक्कम जप्‍त केली आहे. दुकानाच्या दरवाजावरील कुलूप दगडाने तोडून त्‍याने आत प्रवेश केला. हा चोरीचा प्रकार दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

४. दुकानात मालक आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताचा शोध घेऊन पोलिसांनी त्‍याला अटक केली.

गतवर्षीही चोरीच्या घटना :

गणेशचतुर्थीच्‍या काळात राज्‍यात वास्‍तव्‍यास असलेले परप्रांतीय आपापली घरे बंद करून मूळ गावी जातात, तर, स्‍थानिकही देवदर्शनासाठी इतर राज्‍यांमध्‍ये जात असतात. याच संधीचा फायदा घेऊन दरवर्षी राज्‍यात परप्रांतीय चोरटे सक्रिय होतात. गतवर्षीही गणेशोत्‍सवाच्‍या काळात राज्‍यात अनेक ठिकाणी चोऱ्यांच्‍या घटना घडल्‍या होत्‍या.

पोलिसांना केले सतर्क : टिकम सिंग

दक्षिण गोव्‍यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी पोलिसांना सतर्क करण्‍यात आले आहे. पोलिसांची गस्‍त वाढवण्‍यात आली आहे. चेकनाक्‍यांवर गोव्‍यात येणाऱ्यांची तपासणी करण्‍यात येत आहे. बंद घरांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. याआधीच्‍या चोरीच्‍या घटनांमध्‍ये सहभागी असलेल्‍यांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT