Vijai Sardesai, South Goa District Hospital  Dainik Gomantak
गोवा

नर्सिंग इन्स्टिट्यूट कि मेडिकल कॉलेज? दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात काय सुरू करावे,ते एकत्र बसून ठरवा! सरदेसाईंचा टोला

Vijai Sardesai: विजय सरदेसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी एकत्र बसून या इस्पितळात नेमके काय सुरू करायचे आहे, ते ठरवावे.

Sameer Panditrao

Vijai Sardesai About South Goa District Hospital

सासष्टी: आरोग्य मंत्री विश्र्वजीत राणे यांनी मंगळवारी मडगावात आल्यावेळी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील वरील दोन मजल्यांवर नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. या संदर्भात बोलताना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी एकत्र बसून या इस्पितळात नेमके काय सुरू करायचे आहे, ते ठरवावे.

सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे इथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल. आरोग्यमंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूटचे घोडे पुढे करतात. त्यामुळे नागरिकांत सुद्धा गोंधळ निर्माण होत असतो. या दोघांनी एकत्र बसून नेमके काय सुरू करणार हे निश्र्चित करावे.

ते पुढे म्हणाले की,‘जीएसआयडीसी’ तातडीने घाऊक मासळी मार्केटमधील ‘एसजीपीडीए’च्या ताब्यात देऊ पहात आहे. आपण या संदर्भात ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष तथा वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याशी बोललो आहे व घाईगडबडीत या मार्केटचे उद्‍घाटन करु नये, असे स्पष्ट केले आहे.

कोल्ड स्टोरेजची (शीत गृह) व्यवस्था नसताना मार्केट सुरू केल्यास केंद्राकडून त्यासाठी मिळणाऱ्या २० कोटी रुपयांना मुकावे लागेल. या मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्याच्या अटीवर केंद्र सरकारच्या मत्स्यसंपदा योजने अंतर्गत २० कोटींचे अनुदान अपेक्षित आहे,असेही ते म्हणाले.

फातोर्ड्यात चुकीचे खपवून घेणार नाही!

या मार्केटमधील भिंतीवर देवमाशाचे (व्हेल) चित्र दाखवले आहे. ते आम्हाला पसंत नाही. त्या ऐवजी बांगडो, तारले, वेल्ली, चणक सारख्या गोमंतकीय मासळीची चित्रे हवी आहेत. त्याच प्रमाणे गोमंतकीय पारंपरिक मासळी विक्रेत्या बाईचे चित्रही हवे आहे. आम्ही फातोर्डा मतदारसंघात काहीही खपवून घेणार नाही, असा गर्भीत इशारा सरदेसाई यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT