South Goa  Dainik Gomantak
गोवा

South Goa : ‘गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन’ची स्थापना

South Goa : डॉ. सीताराम कोरगावकर अध्यक्ष, डॉ. व्यंकटेश नेवगी यांची सचिवपदी नियुक्ती

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

सासष्टी, मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ‘गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन’ची स्थापना करण्यात आली.

डॉ. सीताराम कोरगावकर यांची अध्यक्षपदी, तर डॉ. व्यंकटेश नेवगी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. निखिल भोमकर हे उपाध्यक्ष, तर डॉ. कुणाल च्यारी खजिनदार असतील.

गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन ही इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेनची शाखा आहे. माणसाला ज्या तीव्र वेदना होतात, त्यासाठी अत्याधुनिक उपाय काय आहेत, याबद्दलची जागृती करणे व वेदना नष्ट करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणे, हा या सोसायटीचा हेतू आहे.

सोसायटी पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात पदभार स्वीकारला. यावेळी आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, मुंबईच्या पेन क्लिनिक ऑफ इंडियाचे संचालक डॉ. कैलाश कोठारी, आरोग्य मंत्र्यांच्या ओएसडी डॉ. राजनंदा देसाई, जिल्हा इस्पितळ निरीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर, इंडिया स्टडी ऑफ पेनच्या अध्यक्ष डॉ. सुनीता लवंगे, सचिव डॉ. प्रवेळ कांथेड आदी उपस्थित होते.

३४० रुग्णांवर उपचार

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गतसाली ऑगस्ट महिन्यात वेदनाशामक क्लिनिक सुरू करण्यात आले.

या क्लिनिकद्वारे आतापर्यंत ३४० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. शिवाय ३० रुग्णांवर वेदनांसंदर्भात यशस्वी प्रक्रिया केल्याची माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. या कार्यक्रमाला गोव्यातील १०० पेक्षा जास्त डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT