Healthcare Facilities Dainik Gomantak
गोवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमआरआय, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजी या विभागांतील सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुरू करण्यात आलेले परिचारिका महाविद्यालय (नर्सिंग) जुन्या हॉस्पिसिओ इमारतीच्या नूतनीकरणानंतर तेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हा इस्पितळाचे वरचे दोन मजले पूर्णपणे आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिले जातील. आरोग्य सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमआरआय, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजी या विभागांतील सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, आरोग्य व अर्थ खात्याचे संयुक्त सचिव प्रणव भट, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. सेलिना नाईक, इस्पितळाचे वैद्यकीय निरीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

दररोज हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य ही दोन क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. जुन्या हॉस्पिसिओ इस्पितळात उपलब्ध नसलेल्या अनेक सुविधा नव्या जिल्हा इस्पितळात सुरू करण्यात आल्या आहेत. येथे रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांचा डॉक्टरांवरील विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण आहे, असे ते म्हणाले.

ऑनलाइन ओपीडीला चांगला प्रतिसाद

इस्पितळातील ऑनलाइन ओपीडी नोंदणी सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एक लाख लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दरमहा एक हजार ते १२०० रुग्णांना डायलिसिस सेवा दिली जाते.

गोव्यातील १६ केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच टेलिमेडिसिन सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना काही आरोग्य सेवा घरबसल्या मिळविणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना पेट्रोलचा खर्च, ना ट्रॅफिक जामची चिंता! पठ्ठ्या थेट पॅरामोटरने जातो ऑफिसला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

SCROLL FOR NEXT