Christmas Festival in Goa | Betalbatim Church Dainik Gomantak
गोवा

Christmas Festival in Goa: 'जिंगल बेल, जिंगल बेल' बेताळभाटीत सजतेय 'आनंदनगरी'

Christmas Festival in Goa: दक्षिण गोव्‍यातील बेताळभाटी चर्च परिसरात सुमारे एक हजार चौरस मीटर जमिनीत येशू ख्रिस्‍ताच्‍या जन्‍मावर देखावा करण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Christmas Festival in Goa: ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ ही धून सासष्टी तालुक्यात घुमण्यास सुरू झाली आहे. नाताळ सण चार दिवसांवर आलेला असताना येथे या सणाच्या तयारीला जोर आला आहे. बेताळभाटी येथे चर्चच्या आवारात तब्बल एक हजार चौरस मीटर क्षेत्रात गोठा उभारणीच्या कामास सुरवात झाली असून त्‍यासाठी रात्रीच्या वेळी संपूर्ण गावच एकत्र येतो.

बेताळभाटी चर्चचे फादर अँड्रियान फुर्तादो यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे येशू जन्माचा स्वयंचलित देखावा उभा करण्यात येणार आहे. बालजेजूच्या भेटीस उंटावरून येणारे तीन राजे आणि त्यावेळी तिथे असणारा माहोल या देखाव्यातून साकार करण्यात येणार आहेत. चालणारे उंट आणि हत्ती हे या गोठ्याचे आकर्षण असतील, असे त्यांनी सांगितले.

  • मागच्या वर्षी बेताळभाटी येथे सुमारे दोन लाख रूपये खर्चून आकर्षक गोठा तयार करण्‍यात आला होता. यावेळी त्यात स्वयंचलित देखाव्यांची भर पडणार आहे, जे विशेष आकर्षण ठरतील.

  • नावेली, सुरावली, मुंगुल, कुडतरी येथेही असे मोठे गोठे उभारण्यास सुरवात केली असून रात्रीच्यावेळी हे काम होत असल्याने या भागात उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. नाताळ सणाच्या चाहुलीने मडगाव बाजारपेठही बहरायला सुरवात झाली आहे.

  • मागच्या दोन वर्षांत कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ सणात लोकांनी या बाजारपेठेकडे पाठ फिरविली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा मिळणारा प्रतिसाद उत्साहजनक असल्याची प्रतिक्रिया मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी व्यक्त केली.

साईश पाणंदीकर, मडगावातील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी-

मडगाव ही कपड्यांची मुख्य बाजारपेठ असून ख्रिसमस सिझनमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी फक्त दक्षिण गोव्यातीलच नव्हे तर उत्तर गोव्यातील म्हापसा, पेडणे तसेच सावंतवाडी येथील लोकही येतात. यंदाही त्यांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. कपडे, सजावटीच्या वस्तू, सोन्याचे दागिने तसेच मिठाईची येत्या चार-पाच दिवसांत होणारी विक्री सहज 20 ते 25 कोटींच्या घरात जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 10 June 2026: आज ग्रहांची महाआघाडी! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस, तुमची रास कोणती?

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT