South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: चिखली चौक ते ‘आयओसी’ जंक्शनपर्यंत अवजड वाहनांना बंदी

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने चिखली चौक ते आयओसी चौक दरम्यानच्या रस्त्यावरून सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी आहे.

दैनिक गोमन्तक

South Goa: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने चिखली चौक ते आयओसी चौक दरम्यानच्या रस्त्यावरून सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदीचा आदेश जारी केला आहे. यामुळे प्रदूषण व अपघातांना आळा बसेल, असे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

या आदेशाची येत्या आठ दिवसांत अंमलबजावणी करण्यात येईल. या आदेशासंबंधी मुरगाव पालिका, सार्वजनिक बांधकाम खात्याने ठिकठिकाणी फलक उभारण्याचे काम हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शहर भागातून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा अवजड वाहने इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपवर येतात. त्यामुळे सकाळी पाल्यांना घेऊन शाळेमध्ये जाणाऱ्या पालकांना त्रास होतो.

आता बायणा उड्डाण पूल तयार झाला असून हा रस्ता वरुणापुरी-मांगोरहिल येथील महामार्गाला जोडल्याने अवजड वाहनांची वाहतूक बायणा पुलावरून व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत आमदार साळकर यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदने दिली होती.

अंमलबजावणीत पेट्रोल पंपचा अडसर

या आदेशाबाबत साळकर यांनी समाधान व्यक्त केले. या आदेशाची अंमलबजावणी होण्यास काही दिवसांचा अवधी लागेल. कारण बरेच ट्रकमालक व अवजड वाहनमालकांनी शहर भागातील पेट्रोल पंपांशी करार केला आहे.

त्यामुळे यासंबंधी तोडगा निघेपर्यंत रिकाम्या अवजड वाहनांना इंधन भरण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT