Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’

इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
Electric Vehicles
Electric VehiclesDainik Gomantak

Electric Vehicles: इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने वाहनधारकांचा खिसा रिकामा होतोय. मात्र, इंधनावर धावणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा पर्याय उपलब्ध असून, बार्देश तालुक्यामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदूषण टाळण्यासाठी सरकारही अशा वाहनांच्या वापरासाठी आग्रही असून राज्यात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’ आलेले दिसत आहेत.

Electric Vehicles
Arambol Chili Farming: प्रसिद्ध ‘हरमलची मिरची’ फुलतेय!

मागील काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढतच आहेत. सध्या पेट्रोलने प्रतिलिटर 97 रुपयांचा टप्पा पार केला आहे.

त्यातच युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या झळा आता आपल्या देशालाही बसत असून, इंधनाचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे.

पेट्रोलियम पदार्थांचा मर्यादित साठा, पेट्रोल-डिझेलवरील वाहनांमुळे मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, प्रदूषण यांमुळे वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करणे अनिवार्य होऊ लागले आहे.

यातूनच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे आला असून, बार्देश तालुक्यात देखील ही वाहने आता मोठ्या संख्येने नजरेस पडू लागली आहेत. ही वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याची माहिती बार्देश तालुक्यातील उपविभागीय वाहतूक कार्यालयातून मिळाली आहे.

Electric Vehicles
Bicholim Waterfall: हरवळेच्या धबधब्यावर पाण्याचा खळखळाट !

बार्देश तालुक्यात गेल्या वर्षी (2022मध्ये) एकूण 1525 ई-वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. त्यामध्ये मोटारसायकलचे प्रमाण अधिक आहे. त्या खालोखाल इलेक्ट्रिक मोटार कारला ग्राहकांची पसंती असून, इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल हळूहळू वाढतो आहे.

कर सवलतीचा ग्राहकांना फायदा : राज्य सरकारने अनुदान बंद केल्याचा किंचित फटका ई-वाहनांना बसला. तरीही लोकांची ई-वाहनास पसंती आहे.

आता चारचाकी व दुचाकी श्रेणीत विविध फिचरसह नवनवीन वाहने बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. जरी अनुदान बंद झाले असले तरी ई-वाहनांच्या देखभालीची जास्त गरज नसते. याशिवाय ई-वाहनांना करसवलत मिळते, ही जमेची बाजू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com