Goa Politics jpg Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील एकंदर राजकारण आणि इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबतही शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे रविवारी किंवा सोमवारी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी संसदेत मांडावयाच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याच्या निमित्ताने शहा यांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतली होती.

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण बंद करून तो पासपोर्ट रद्द करण्याचे धोरण केंद्रीय गृह मंत्रालयाने अवलंबल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत विशेषतः दक्षिण गोव्यात भाजपला कसा बसू शकतो, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे हाही प्रश्न सोडवण्यासाठीचे आदेश येत्या दोन-तीन दिवसांत जारी केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी संसदेत सादर करण्यात येणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली.

गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातून गेलेल्या शिष्टमंडळाला आदिवासी आरक्षण देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू करतो, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती त्यांनी केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले होते.

गृहमंत्री अमित शहा यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोव्यातील आदिवासी समुदायाला राजकीय आरक्षण देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे. गृहमंत्र्यांनी या विषयाचे समर्थन केल्याबद्दल जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार!
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT