South Goa AI traffic camera Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rule: ट्रिपल सीट, ओव्हरस्पीड आता महागात पडणार! 'दक्षिणे'त 14 ठिकाणी 'AI कॅमेऱ्यां'चा पहारा, नियम मोडल्यास 'दंड' थेट मोबाईलवर

South Goa AI traffic camera: गाेबेशिस्‍त वाहनचालकांवर नजर ठेवण्‍यासाठी दक्षिण गोव्‍यात तब्‍बल १४ महत्त्वाच्‍या ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्‍यात येणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गाेव्‍यात बेशिस्‍त आणि बेफिकीर वाहतुकीमुळे अपघात वाढत असून अशा बेशिस्‍त वाहनचालकांवर नजर ठेवण्‍यासाठी दक्षिण गोव्‍यात तब्‍बल १४ महत्त्वाच्‍या ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्‍यात येणार आहेत. हे कॅमेरे वाहनचालकांची बेशिस्‍त चित्रीत करून त्‍यांना चलन पाठविण्‍याचे काम यंत्रणा करणार आहे. गोव्‍यात एकूण ९२ ठिकाणी अशाप्रकारचे कॅमेरे बसविण्‍यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

गोव्‍याचे वाहतूक संचालक परिमल अभिषेक यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, टप्प्‍याटप्‍प्‍याने हे कॅमेरे बसविण्‍याचे काम हाती घेतले जाणार आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात दक्षिण गोव्‍यात ओल्‍ड मार्केट सर्कल, आर्लेम सर्कल, बोलशे सर्कल, मुंजविहार, पाॅवर हाऊस, गोरवोटी-नुवे, गोवा सिरॅमिक, टाटा शोरुम नुवे, नुवे बायपास, लोटली मिसिंग लिंक, नावेली, बेले आणि बिर्ला क्रॉस या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्‍यात येणार आहेत.

सध्‍या हे कॅमेरे बसविण्‍याचे आणि त्‍याची चाचणी घेण्‍याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी अखेरीस ते कार्यान्वित करण्‍यात येतील. हे कॅमेरे सर्व बेकायदेशीरपणा टिपून घेणार असल्‍यामुळे आणि २४×७ या पद्धतीने ते चालू राहणार असल्‍यामुळे रस्‍त्‍यावर पोलिस ठेवून तपासणी करण्‍यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येणार असल्‍याची माहिती अभिषेक यांनी दिली.

कायद्याचे उल्लंघन अचूक टीपणार

हे स्‍मार्ट कॅमेरे ओव्‍हर स्पीड, वाहतूक कायद्याचे उल्‍लंघन, दुचाकीवरून तिहेरी वाहतूक, सीट बेल्‍ट धारण न करणे अशा गोष्‍टी टिपणार असून त्‍यानंतर स्‍वयंचलितरीत्‍या यासंबंधी चलन तयार करणार आहे. अन्‍य ठिकाणी काही महिन्‍यांनंतर अशी यंत्रणा बसविली जाईल, असे अभिषेक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT