Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पत्‍नीच्‍या खूनप्रकरणी दोषी पतीला कोर्टाने सुनावली जन्‍मठेपेची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला

South Goa Additional Sessions Court: वेर्णा पोलिस स्‍थानकाचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी या गुन्‍ह्याचे तपास अधिकारी म्‍हणून काम केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: पत्‍नीने शरीर सुखास नकार दिल्‍याने संतापलेल्या पती अशोक कुमारने स्‍वत:च्‍या पत्‍नीचा गळा दाबून खून केल्‍याप्रकरणी दक्षिण गोवा अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी संशयिताला दोषी ठरवून जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

याशिवाय संशयिताला ५० हजारांचा दंड फर्मावला असून ही दंडाची रक्‍कम त्याच्या दोन लहान मुलांना देण्‍याचा आदेश न्‍यायालयाने दिला आहे. झरी जुआरीनगर, सांकवाळ येथे २५ मार्च २०१९ रोजी ही घटना घडली होती. त्‍यावेळी आरोपी आपली पत्‍नी के. बिंदू (३९) व दोन लहान मुलांबरोबर भाड्याच्‍या खाेलीत रहात होता. त्यावेळी रात्री १.३० ते २ च्या दरम्‍यान त्याने शरीर सुखाची मागणी केल्‍यानंतर पत्‍नीने नकार दिला. यावेळी संशयित व बिंदू यांच्‍यात भांडण होऊन संशयिताने आपल्‍या पत्‍नीचा गळा दाबून खून केल्‍याचा आरोप अशोक कुमारवर ठेवण्‍यात आला होता. या खटल्‍यात सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदारांची

साक्ष न्‍यायालयात सादर करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे आरोपीच्‍या पाच वर्षाच्‍या मुलीची साक्ष महत्‍वाची ठरली. मुलीने आपल्‍या वडिलांनी आईचा गळा दोन्‍ही हातांनी दाबून तिला मारल्‍याचे आपण प्रत्‍यक्ष पाहिल्‍याची जबानी न्‍यायालयात दिली. या व्‍यतिरिक्‍त खुनाच्‍या घटनेनंतर स्‍वत: सांकवाळ पोलिस आऊट पोस्‍टवर जाऊन गुन्‍ह्याची माहिती पोलिसांना दिली हाेती.

वेर्णा पोलिस स्‍थानकाचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी या गुन्‍ह्याचे तपास अधिकारी म्‍हणून काम केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्‍ता उत्‍कर्ष आवडे यांनी काम पाहिले होते. अंतिम युक्‍तीवादाच्‍यावेळी आवडे यांनी संशयिताने फक्‍त पत्‍नीचाच खून केला नाही तर, हा खून करून दोन निष्‍पाप मुलांना आईच्‍या प्रेमापासून दूर लोटले, त्‍यामुळे त्‍याला कडक शिक्षा फर्मावण्‍याची मागणी केली होता. न्‍यायालयाने ही मागणी ऐकून घेऊन संशयिताने दंडाची रक्‍कम भरल्‍यास ती समसमान रुपाने दोन्‍ही मुलांच्‍या नावावर कायम ठेव स्‍वरूपात बँकेत जमा करावे, असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री उसगावात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT