Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Crime News: पर्वरी, गोव्यात आयपीएलच्या हैद्राबाद आणि चेन्नई सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेण्यात येत होता.
Goa IPL Betting Case
Goa IPL Betting CaseDainik Gomantak

गोव्यात पुन्हा एकदा आयपीएल बेटिंगवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने डिफेन्स कॉलनी, पर्वरी येथील एका व्हिालावर रविवारी (दि.२८) रात्री उशीरा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातील १६ जणांना अटक केलीय.

त्यांच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विपुल कुमार ठक्कर, निशांत ठक्कर, सचिन ठक्कर, ऋत्विक ठक्कर, हर्षिदकुमार ठक्कर, विशाल ठक्कर, भावेश ठक्कर, चिराग ठक्कर, क्रिश मेहेसुरीया, संजयकुमार नयी, हर्ष घांची, रोहनकुमार ठक्कर, अल्केशकुमार वाघेला, मिहीर ठक्कर, विश्वासकुमार ठक्कर (सर्व रा. पाटणा, गुजरात) आणि अमित कुमार (थाथी, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पर्वरी, डिफेन्स कॉलनीतील एका व्हिलामध्ये हैद्राबाद आणि चेन्नई या आयपीएलच्या सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेतली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

Goa IPL Betting Case
Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ एक टीम तयार करुन व्हिलावर छापा टाकत सोळा संशयितांना अटक केली, तसेच मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून नऊ लॅपटॉप, एक़ टॅबलेट, 46 मोबाईल फोन, 12 हजार 670 रोकड आणि इतर साहित्य मिळून 15 लाख 15 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यापूर्वी देखील आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या टोळीवर कारवाई करत पोलिसांनी कांदोळीमधून अटक केली होती. पोलिसांनी गुजरातमधील नऊ जणांना अटक करत चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com