Hearing On Eco Sensitive Zone At Khola Panchayt Dainik Gomantak
गोवा

Western Ghats Eco Sensitive Zones: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळा! 11 पंचायतींची मागणी

खोल येथे केंद्रीय समितीकडून सर्वेक्षण, शेकडोंची उपस्‍थिती

दैनिक गोमन्तक

Peopel Gathering At Khola Panchayt For The Hearing On Eco Sensitive Zone: पश्चिम घाट परिसरात येणाऱ्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्‍यासाठी सोमवारी खोल येथे आलेल्‍या केंद्रीय तज्‍ज्ञांच्‍या समितीसमोर काणकोण, सांगे व धारबांदोडा या तीन तालुक्‍यांतील 11 पंचायतींनी आपली गावे वगळण्‍याची मागणी केली.

मात्र, ही जनसुनावणी नाही, त्‍यामुळे आम्‍ही तुमची निवेदने स्‍वीकारू शकत नाही, अशी भूमिका या समितीने घेतल्‍याने शेवटी ही निवेदने समाज कल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आली.

पंचायतींनी दिलेली निवेदने मुख्‍यमंत्र्यांसमोर मांडू असे आश्‍‍वासन यावेळी फळदेसाई यांनी पंचसदस्‍यांना दिले. या संवेदनशील क्षेत्रांसंदर्भात खोल येथे जनसुनावणी होणार, असे पंचायतींना सांगण्‍यात आल्‍याने आज मोठ्या प्रमाणावर पंचसदस्‍य आणि स्‍थानिक लोक खोल येथे उपस्‍थित होते.

मात्र, आमची समिती केवळ सर्वेक्षण करण्‍यासाठी आली आहे. जनसुनावणी घेण्‍याचा आम्‍हाला कोणताही अधिकार नाही, असे या समितीचे अध्‍यक्ष संजयकुमार शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले.

या पंचायतींनी दिली निवेदने

निवेदने देणाऱ्या पंचायतींमध्‍ये खोतीगाव, खोल, नेत्रावळी, रिवण, मोले, सावर्डे, किर्लपाल-दाभाळ, काले, धारबांदोडा, कुळे आणि भाटी या पंचायत सदस्‍यांचा समावेश आहे.

यावेळी या पंचसदस्‍यांची समजूत काढताना हे सर्वेक्षण पर्यावरण संवेदनशील विभाग तयार करण्‍यासाठी नसून केवळ पर्यावरण संवेदनशील क्षेत्र ठरविण्‍यासाठी आहे.

या क्षेत्रामुळे स्‍थानिकांच्‍या अधिकारांवर कुठलेही निर्बंध येणार नाहीत, असेही संजयकुमार शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले.

"खोल पंचायत पर्यटन क्षेत्र म्‍हणून पुढे येत असून, कित्‍येक युवकांनी या भागात गुंतवणूक केलेली आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामुळे त्‍यावर निर्बंध येत असतील तर आम्‍ही ते खपवून घेणार नाही. आमची गावे या क्षेत्रातून वगळावीत, अशी आमची मागणी आहे."

- पंढरी प्रभुदेसाई, खोल पंचसदस्‍य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT