Film City in Goa: लोलये येथे साकारणार बहुचर्चित चित्रनगरी...

पर्रीकरांचे स्वप्न साकार, ‘कोमुनिदाद’च्‍या आमसभेत 250 एकर जमीन देण्‍यास मंजुरी
Built Film City In Goa
Built Film City In GoaDainik Gomantak

Film City in Goa लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या खास आमसभेत फिल्मसिटीसाठी जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या आज झालेल्या खास आमसभेत ही मंजुरी देण्यात आली. फिल्मसिटीसाठी इंटरटेन्मेंट सोसायटीला जमीन देण्याच्या प्रस्तावाला यावेळी सर्वानुमते मान्यता देण्यात आली, असे संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक यांनी सांगितले.

कोमुनिदाद संस्थेच्या भागधारकांची सभा आज लोलये येथील श्री केशव देवालयाच्या सभागृहात घेण्यात आली. संस्थेचे एकूण ११८ भागधारक असून त्यापैकी काही हयात नाहीत. आजच्या सभेला सुमारे पन्नास भागधारक उपस्थित होते.

सरकारने जारी केलेल्या आव्हानाप्रमाणे कोमुनिदाद मालकीच्या भगवती पठारावरील २५० एकर जमीन फिल्मसिटीसाठी देण्याचे सभेत एकमताने ठरविण्यात आले असल्याचे वारीक यांनी सांगितले.

आयआयटीच्या विरोधानंतर...

आयआयटीला लोलये येथे विरोध झाला होता. मात्र, तेथे फिल्‍मसिटी होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवंगत मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्‍यात आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सव सुरू केला होता, तेव्‍हा गोव्‍यात चित्रनगरी उभी रहावी, अशी मनीषा बाळगली होती. दरम्‍यान, राज्‍य सरकारने चित्रपट नगरीसाठी जागा देण्‍याचे आवाहन केले होते. त्‍याला अनुसरून लोलये येथे जागा उपलब्‍ध होत आहे.

मोठी उलाढाल शक्‍य

काही दिवसांपूर्वीच मायकल लोबो यांनी बिल्‍डर लॉबीने चित्रनगरीसाठी जमीन देण्यास पुढाकार घ्‍यावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली होती. लोलले येथे जमीन उपलब्‍ध होत असल्‍याने सिनेनिर्मितीच्‍या माध्‍यमातून मोठी उलाढाल होणे शक्‍य आहे.

गाव व तालुक्यातील बेरोजगारी काही प्रमाणात हटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फिल्मसिटी हा प्रकल्प अप्रदूषणकारी असल्यानेच त्या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे लोलये - पोळे कोमुनिदाद संस्थेच्या आमसभेत सर्वानुमते ठरविण्यात आले.

- भूषण प्रभुगावकर, एक भागधारक

Built Film City In Goa
Goa Monsoon 2023: परतीच्या पावसाचा डिचोली- सत्तरीला तडाखा; बळीराजा चिंताग्रस्त

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com