Illegal Tax Collection Gomantak Digital Team
गोवा

Illegal Tax Collection: विनापावती सोपो कर गाजणार!

ऑस्ट्रेलिया दौराही चर्चेत : मनपाची आजची बैठक ठरणार वादळी

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Tax Collection in Panaji: पणजी महानगरपालिकेची उद्या शुक्रवारी रोजी संध्‍याकाळी ४ वाजता बैठक होणार आहे.

नगरसेवक उदय मडकईकर यांनी चव्हाट्यावर आणलेला विनापावती सोपो कराचा विषय आणि पुढील काही आठवड्यांत महापौर-उपमहापौर व आयुक्त अशा तिघांच्‍या संभाव्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्‍या खर्चाला मान्यता मिळविण्याचा विषय या बैठकीत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

माजी महापौर तथा नगरसेवक मडकईकर यांनी तीन दिवसांपूर्वी मासळी मार्केटबाहेर रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या विक्रेत्यांकडून महानगरपालिका कर्मचारी विनापावती सोपो कर घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता.

त्यातून दोन वर्षांपासून विनापावती कर आकारणी होत असल्याचे स्‍पष्‍ट झाले होते. परंतु सुपरवायझरच्या प्राथमिक चौकशीत आयुक्तांना हा प्रकार पधंरा वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पंधरा वर्षांपासून वसूल झालेल्या करापैकी किती रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत गेली आणि किती कोणाच्या खिशात गेली, याची चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे.

हा विषय ताजा असल्याने विरोधी बाकावरील सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर या बैठकीत पूर्ण तयारी निशी उतरणार आहेत.

नगरसेवकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ज्या पद्धतीने नगरसेवक आळीमिळी गुपचिळीसारखे बसतात, त्यावरून अनेकांची या प्रकाराकडे बघ्याची भूमिका राहणार हे स्पष्ट आहे.

शिवाय शहरात सुरू असलेल्या गेमिंगसाठी प्रोटेक्शन मनी संकलन करण्याची चर्चाही नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे हा विषयही ऐऩवेळी पुढे येणार असे दिसते.

मार्केट इमारत दुरुस्तीचा विषयही येणार

काही आठवड्यांनी महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक आणि आयुक्त असे तिघेजण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दौऱ्याचा खर्च महानगरपालिकेच्या तिजोरीतून होणार आहे.

या खर्चाचा विषय या बैठकीत मंजुरीला टाकण्याची शक्यता आहे. शिवाय मागील बैठकीतील काही विषयांना मंजुरी देण्यासह मार्केट इमारतीची दुरुस्ती, संगणकतज्‍ज्ञाच्या सेवाकार्यास मुदतवाढ असेही काही विषय विषयपत्रिकेवर आहेत. त्‍यावरही गरमागरम चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT