Go First Plans to Restart Services from 24 May: गो फर्स्ट एअरलाइन त्यांची फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एअरलाइन 24 मे पासून आपली फ्लाइट सेवा पुन्हा सुरू करू शकते. लहान-मोठे फ्लाइटसह सुरू होऊ शकते.
अहवालानुसार 23 विमानांनी विमानसेवा सुरू करण्याची योजना सुरु करणार असुन 2 मे पर्यंत विमान कंपनीची एकूण 27 विमाने उड्डाण सेवा देत होती. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर त्याचे 51 आणि 37 डिपार्चर स्लॉट आहेत.
विशेष म्हणजे, एअरलाइनने एक दिवस आधी घोषणा केली होती की त्यांनी 19 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत, तर त्यापूर्वी 12 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
NCLT संरक्षण देण्यास सहमत
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने GoFirst ला सुरक्षा देण्याचे मान्य केले आहे. एनसीएलटीने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आम्ही दिवाळखोरीच्या कारवाईसाठी गो फर्स्ट एअरलाइनची याचिका स्वीकारतो.
एनसीएलटीने कंपनीला एअरलाइन चालू ठेवण्याचे आणि कर्मचाऱ्यांची छाटणी न करण्याचे आदेश दिले आहेत.
40 विमाने परत करण्याची मागणी
एनसीएलटीच्या आदेशानंतर गोफर्स्टचे सीईओ कौशिक खोना यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. भारतातील (India) ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या भारतीय विमान कंपनीने स्वेच्छेने करार आणि कर्जाची फेरनिविदा करण्यासाठी दिवाळखोरी संरक्षणाची मागणी केली आहे. त्याच वेळी, भाडे न भरल्यामुळे, सुमारे 40 गो फर्स्ट विमाने परत करण्याची मागणी विमान वाहतूक नियामकाकडे करण्यात आली आहे.
प्रवाशांना रिफंडची चिंता
GoFirst Airline ही सर्वात स्वस्त दरात फ्लाइट तिकीट ऑफर करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. अनेक उड्डाणे रद्द केल्यानंतर, बहुतेक प्रवासी अजूनही परताव्याच्या चिंतेत आहेत. प्रवाशांना परतावा मिळत नाही. दुसरीकडे, विमान कंपनीने लवकरच सर्व प्रवाशांचे संपूर्ण पैसे परत केले जातील असे सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.