Jerson Gomes Attack Dainik Gomantak
गोवा

सोपो कंत्राटाच्या पैशांवरून वाद पेटला; चिंचोणेच्या सरपंचावर हल्ला, हल्लेखोर फरार

Jerson Gomes Attack: सोपो कंत्राटाच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान देवसा चिंचोणे पंचायतीचे सरपंच आणि आम आदमी पक्षाचे गोव्याचे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांच्यावरील हल्ल्यात झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सोपो कंत्राटाच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान देवसा चिंचोणे पंचायतीचे सरपंच आणि आम आदमी पक्षाचे गोव्याचे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांच्यावरील हल्ल्यात झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास सोशल मीडिया कार्यकर्ते माल्कम परेरा याने पंचायत कार्यालयात गोम्स यांच्याशी हुज्जत घालत त्यांना पायऱ्यांवरून ढकलून दिले.

यात गोम्स यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर माल्कम परेरा हा सध्या फरार असून, पोलिस त्याच्या शोधात असल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. माहितीनुसार, सरपंच गोम्स यांनी यापूर्वी परेरा याच्याविरोधात आपल्याला शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात पोलिसांनी परेराविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता.

त्यानंतर आजचा हा हल्ला झाला. दरम्यान, परेरा याने पंचायतीचे सोपो कंत्राट घेतले असून, त्याने पंचायतीत पुरेसे पैसे न भरल्याने त्याला नोटीस बजावली होती. याच कारणाने परेरा याने पंचायतीत येऊन सरपंच गोम्स यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना पायऱ्यांवरून ढकलून दिले. पायऱ्यांची कड छातीला लागल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने बाळ्ळी आरोग्य केंद्रात हलविण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

जाणूनबुजून केलेला हल्ला : क्रूझ

माल्कम परेरा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आणि गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्याचा बेकायदेशीर धंद्यातही हात असल्याचे उघड झाले होते, असा आरोप वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT