Sonsodo problem to be solved in 18 months Dainik Gomantak
गोवा

'18 महिन्यांत सोनसोडोतील समस्या सोडवू'

मंत्री मोन्सेरात: 25 टनाचे दोन बायो डायजेस्टर बसविण्याची शिफारस

दैनिक गोमन्तक

मडगाव: सोनसोडो कचरा समस्येवर येत्या 18 महिन्यांत पूर्णतः तोडगा काढू, असे आश्वासन आज (मंगळवारी) घन कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले. येथील कचऱ्यावर साळगाव येथे केल्या जात असलेल्या पद्धतीनेच प्रक्रिया केली जाणार असून, त्यासाठी प्रत्येकी 25 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे दोन बायोडायजेस्टर प्रकल्प बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोन्सेरात यांनी सोनसोडो प्रकल्पाला भेट देऊन स्थानिक आमदार आणि नगरपालिका मंडळ सदस्यांबरोबर चर्चा केली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते.

मोन्सेरात म्हणाले, सोनसोडो समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या ज्या कचऱ्याच्या राशी येथे पडून आहेत त्या प्राधान्य क्रमाने साफ करण्यात येणार आहेत. त्यानंतर हे प्रक्रिया प्रकल्प बसविण्यात येणार आहेत. यासाठी मडगाव पालिका आपली जमीन घन कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या ताब्यात देणार आहे.

दरम्यान, सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्प शेडमध्ये जो 14 हजार टन ओला कचरा पडून आहे तो हटवून त्यावर बायो रेमेडियेशन पद्धतीने प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे कार्यकारी संचालक लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली.

जुना कचरा डिसेंबरपर्यंत स्वच्छ करणार: घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे कार्यकारी संचालक मार्टिन्स यांनी सांगितले, या यार्डात जास्तीत जास्त जुन्या कचऱ्याचे मे महिन्यापर्यंत रेमेडियेशन करण्यात येणार आहे. जर आणखी कचरा राहिलाच तर तो डिसेंबर 2022 पर्यंत हटविला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दोन बायोडायजेस्टर प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यातून जो मिथेन गॅस तयार होतो त्यापासून वीज तयार केली जाणार आहे. साळगाव येथे जे तंत्रज्ञान वापरले गेले आहे तेच येथे वापरले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT