Sonsodo Garbage Plant Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Plant : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून सोनसडोची पाहणी

सोनसडो कचरा यार्डाची पाहणी करण्याचे गोवा खंडपीठाने आदेश दिले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Sonsodo Garbage Plant : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांनी आज सोनसडो कचरा यार्डातील परिस्थितीचा आढावा घेतला.

सोनसडो कचरा व्यवस्थापनामुळे आगीच्या आणि आपत्कालीन घटनांसंदर्भात आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तथा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून उद्या 11 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली.

सिटीजन फाॅर सोनसडो आणि गोवा फाऊंडेशन या बिगर सरकारी संस्थानी सोनसडो कचरा यार्डातील आगीच्या घटनांसंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सोमवारी सुनावणी सुरू असताना, गेल्या आठवड्यात सोनसडोतील कचऱ्याला पुन्हा आग लागल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

खंडपीठाने आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची सूचना केली होती. अश्विन चंद्रू ए. यांनी लगेच दुपारी पाहणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT