Goa Youth Congress : राहुल गांधींवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा आंदोलनाचा निर्धार

दोन्ही लोकसभा मतदारसंघ यावेळी जिंकणार : रिची भार्गव
Goa Pradesh Youth Congress
Goa Pradesh Youth CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Pradesh Youth Congress : युवक काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तशीच गोव्यातही महत्त्वाची भूमिका बजावली जाईल. आम्ही दक्षिण आणि उत्तर गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ यावेळी जिंकणार असा विश्वास गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रभारी आणि भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव रिची भार्गव यांनी व्यक्त केला.

युवक काँग्रेसची नुकतीच राज्य कार्यकारिणीची बैठक इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल गांधी यांच्यावरील अन्यायकारक अपात्रतेच्या विरोधात आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच राज्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Goa Pradesh Youth Congress
Sanjivani Sugar Factory : सरकारने कामगारांना अन्य खात्यांमध्ये सामावून घ्यावे : ख्रिस्तोफर फोन्सेका

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिची भार्गव, उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा, गिना पॅरेरा, वैष्णव पेडणेकर, राज्य सरचिटणीस लिओविटा पॅरेरा डी आंद्राद्र, यश कोचरेकर आणि उबेदुल्ला खान, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष महेश नादर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष रिनाल्डो रुझारियो, राज्य सोशल मीडिया समन्वयक देवसुरभी यदुवंशी, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते

Goa Pradesh Youth Congress
Rumdamol Dovorlim News: रूमडामळ दवर्लीत अज्ञाताने फोडल्या दोन कार; तणावाचे वातावरण

रिची भार्गव म्हणाल्या की, लोकशाहीचे रक्षण करण्याची गरज आहे. आम्ही 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करत आहोत, हे केवळ गोव्यासाठीच नव्हे तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी युवकांनी एकजुटीने काम करायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीत ’युवा जोडो बूथ जोडो’ अभियानांतर्गत बुथ स्तरावर संघटना बांधणीचा ठराव घेण्यात आला. या माध्यमातून 2024 च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाठिंबा मिळवण्यात युवकांची मोठी भूमिका असणार आहे. भाजपने लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी अलीकडेच जातीय समस्या निर्माण केल्या आहेत, हे लक्षात घेऊन हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com