Murgao palika  Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Issue : खंडपीठाने फटकारल्यावर पालिकेला जाग, चक्क अभियंत्याचे कार्यालयच केले स्थलांतरित

पालिकेला जाग : कामतांकडून आढावा; 30 टन कचरा साळगावला

गोमन्तक डिजिटल टीम

Sonsodo Garbage Issue : सोनसोडोवरील कचरा हटविण्‍याप्रकरणी मडगाव पालिकेने दाखविलेल्‍या अनास्‍थेबद्दल मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेऊन ताशेरे ओढल्‍यानंतर जाग आलेल्‍या पालिकेने आपल्‍या अभियंत्‍यांचे कार्यालयच आजपासून सोनसोडोवर स्‍थलांतरित केले आहे. मुख्‍य पालिका अभियंत्‍यांसह एकूण चार अभियंत्‍यांची नेमणूक या प्रकल्‍पावर आळीपाळीने करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

दरम्‍यान, आजपासून मडगावातून 30 टन ओला कचरा साळगाव कचरा प्रक्रिया प्रक़ल्‍पावर पाठविण्‍यास सुरूवात केली आहे. कचऱ्याचे पाच ट्रक आज साळगावला रवाना केल्‍याची माहिती पालिकेतून मिळाली.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज सोनसोडोवर जाऊन स्‍थितीची पाहणी केली. त्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयात त्‍यांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. पालिकेशिवाय कित्‍येक हॉटेलवाले आपला कचरा रात्रीच्‍यावेळी सोनसोडोवर आणून टाकत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

यापुढे त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पालिका कर्मचारी आणि पोलिस यांच्‍या संयुक्‍त पथकाची रात्रीची गस्‍त सुरू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. जर कुणी असा कचरा टाकताना आढळला तर त्‍याच्‍यावर कडक कारवाई करण्‍याचा आदेश यावेळी देण्‍यात आला.

दरम्‍यान, अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध यावेत यासाठी सोनसोडो यार्डाच्‍या भागात सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍याचा निर्णय आजच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

कामत यांचा पाय चिखलात

सोनसोडो कचरा प्रकल्‍पाची पाहणी करण्‍यासाठी गेलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना तेथे असलेल्‍या गटाराचा अंदाज न आल्‍याने त्‍यांचा पाय चिखलात रुतला. सुदैवाने त्‍यांना कोणतीही इजा झाली नाही. तेथे असलेल्‍या अन्‍य अधिकाऱ्यांनी त्‍वरित हात देऊन त्‍यांना वर काढले. मात्र यामुळे कामत यांना सोनसोडोची स्‍थिती काय आहे याचा अंदाज आला.

बांधकाम परवाने देणे केले बंद

पुढील सुनावणी होईपर्यंत मडगाव पालिकेने कोणतेही बांधकाम परवाने देऊ नयेत असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिल्‍यानंतर मडगावचे मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी ही प्रक्रिया कालपासूनच बंद केली.

पुढील आदेश येईपर्यंत बांधकाम परवान्‍याच्‍या फाईल्‍स आपल्‍यापर्यंत पाठवू नयेत असा आदेश त्‍यांनी पालिकेच्‍या तांत्रिक विभागाला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT