New Parliament Murals | Sonia Rodrigues Sabharwal Dainik Gomantak
गोवा

New Parliament Murals: नव्या संसद भवनाला गोमंतकीय कलेचा ‘हात’

सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांना म्युरल्स साकारण्याची संधी

दैनिक गोमन्तक डिजिटल

New Parliament Murals: राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे उद्‌घाटन झाले. या नव्या संसद भवनाच्या उभारणीत देशभरातील कारागीरांचे हात लागले आहेत.

या भवनाच्या सौंदर्यीकरणातही विविध कलावंतांची मदत घेतली गेली आहे. त्यात गोव्याच्या सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांचेही योगदान महत्वपूर्ण ठरले.

नव्या संसद भवनातील म्युरल्ससाठी गोमंतकीय कलावंत सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांची निवड झाली होती. येथील म्युरल्सचे रंगकाम सोनियांनी केले आहे. या कामासाठी गोव्यातून निवड होणाऱ्या त्या एकमेव कलावंत होत्या.

देशभरातून ७५ महिला कलाकार यात सहभागी झाल्या होत्या. सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले.

दिल्लीच्या ललित कला अकादमीने ही निवड केली होती. सत्यभामा माझी आणि शरद कुमार यांनी याचे कोऑर्डिनेशन केले.

"गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. या प्रचंड म्युरल्सवर गोव्यातील सेव्हन सिस्टर गॉडेसपैकी एकीला स्थान मिळाले आहे. कावी डिझाईनमध्ये म्युरलवर ही कलाकृती साकारली गेली आहे."

सोनिया रॉड्रिग्ज-सबरवाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

SCROLL FOR NEXT