Mapusa Market New Look: म्हापसा मार्केटला नवीन स्वरूप

पाच वर्षांचा विलंब : ओव्हरहेड वाहिन्यांच्या गुंत्यातून रस्त्याची सुटका
Mapusa Market
Mapusa MarketGomantak Digital Team

Mapusa Market New Look: सुमारे पाच वर्षांच्या विलंबानंतर म्हापसा येथील मुख्य बाजरपेठेच्या रस्त्यालगतच्या वीज तारा भूमिगत झाल्या आहेत आणि संपूर्ण भागाला नवीन स्वरूप देऊन मुख्य रस्त्याचे अखेर रूपडे पालटण्यात आले.

सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून आता रस्त्याच्या मधोमध नवीन शोभा आणणारे पथदीप खांब बसविलेत. दरम्यान, या योजनेचा भाग असलेल्या संपूर्ण भागाच्या हॉटमिक्सिंगसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.

जुने विजेचे खांब बदलण्याचे आणि युनियन फार्मसी ते म्हापसा अर्बन बँक या रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे काम २०१८ मध्ये गोवा राज्य नागरी विकास एजन्सीद्वारे हाती घेतले होते. ते तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु शेवटी पाच वर्षे लागली.

एजन्सीने महत्त्वाच्या रस्त्याच्या पट्ट्याचे संपूर्ण व स्मार्ट रूपडे देण्यासाठी योजना आखलेली. ज्यात ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत वाहिन्यांसह बदलणे आणि जुन्या विजेच्या खांबांना दोन ‘टू-आर्म’ खांबांसह बदलणे यात समाविष्ट होते.

Mapusa Market
Goa Statehood Day: काय आहे गोवा घटकराज्य दिन? 7 पॉईंट्समध्ये जाणून घ्या, या दिवसाचे महत्व...

प्रकल्पाला निधी मिळण्यास थोडा विलंब झाल्यामुळे प्रस्तावित काम पूर्ण होण्याच्या अनेक (डेडलाईन्स) मुदती चुकल्या. माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा (बाबूश) हे अध्यक्ष आणि मी जीसुडाचा उपाध्यक्ष असताना हे काम मंजूर करण्यात आले होते आणि ते सुरू झालेले.

परंतु निधी देण्यास विलंब झाल्यामुळे कामास थोडा विलंब झाला, असे माजी नगराध्यक्ष संदीप फळारी म्हणाले. म्हापसा रहिवाशांनी या बाजारपेठेच्या रस्त्याच्या सुशोभिकरणाचे कौतुक केले आणि असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प शहरात हाती घेतले जातील, अशी आशा व्यक्त केली आहे.

तर शहरातील पार्किंगच्या महत्त्वाच्या विषयाकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावी, अशी स्थानिक नारायण राटवड यांनी मागणी केली.

Mapusa Market
Panaji : पणजीतील रस्त्यावर रात्री 'नेकेड मॅन'चा वावर! फोटो सोशल मिडियावर व्हायरल

ओंगळवाणे रुप झाले गायब

युनियन फार्मसी ते म्हापसा अर्बन बँकेपर्यंत या मार्गावर अनेक जुने सिंमेटचे वीजखांब होते. यावरुन अनेक इतर वाहिन्या गेल्या होत्या. या खांबावरुन सर्वत्र लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे पसरल्याने हे विदारक दृश्य दिसायचे.

या उघड्या आणि लोंबकळत वाहिन्या जणू काही एखाद्या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या वाहिन्या असल्याचे संकेत वर्तवले जात होते. या प्रकारामुळे या संपूर्ण परिसराला ओंगळवाणे रूप आले होते.

अनेकांनी वीजखांबावरून बेकायदेशीरपणे अनेक केबल टाकले होते. त्यामुळे हा पूर्ण पल्ला वाहिन्यांच्या गुंत्यात हरवला होता. अखेर हे रूप जीसुडाअंतर्गत बदलण्यात आले.

Mapusa Market
Goa Accident News : ट्रकखाली आल्याने बालकाचा जागीच अंत; चालकाला अटक

म्हापसा मार्केट रस्त्यालगत भूमिगत केबलिंगचे काम यशस्वीरित्या राबविले आहे. इतर भूमिगत केबल टाकण्याचे प्रकल्प उत्तरोत्तर आणि चांगल्या गतीने केले जात आहे.

हे म्हापसासाठी एक नवीन सुरवात आहे. कारण लवकरच शहर ओव्हरहेड वाहिन्यांपासून मुक्त होईल.

जोशुआ डिसोझा, उपसभापती तथा स्थानिक आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com