पणजी: भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुखविंदर सिंगला परदेशात प्रवास करण्याची कोर्टाने परवानगी दिली आहे. सुखविंदर बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनियाला जाणार आहे. यासाठी त्यांने परदेशात प्रवास करण्याची कोर्टाकडे परवानगी मागितली होती. यासाठी गोवा सत्र न्यायालयाने त्याला परवानगी दिली आहे.
सुखविंदर सिंग हा सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणातील एक मुख्य आरोपी आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये सोनालीचा गोव्यात खून झाला होता. याप्रकरणी सुखविंदर यांच्यासह फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान या दोघांना अटक करण्यात आली होती. सुखविंदरने इंडोनेशियाला जाण्यासाठी दोन आठवड्यांची परवानगी मागितली होती. बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने ही परवानगी मागितली होती.
सुखविंदरच्या या मागणीला फिर्यादींकडून विरोध दर्शविण्यात आला होता. दरम्यान, सिंगने बाली, इंडोनेशिया येथे जाण्याचा संपूर्ण प्लॅन न्यायालयासमोर सादर केला. ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीसाठी त्याने ही परवानगी मागितली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद अगा यांनी अटी शर्तीसह सुखविंदरला परदेशात जाण्यास परवानगी दिली आहे.
काय आहेत अटी?
सुखविंदरला परदेशातून आल्यानंतर सीबीआयकडे पासपोर्ट सादर करावा लागणार आहे. लेखी प्रतिज्ञापत्र देखील सादर करावे लागणार आहे. यासह संपर्क माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, परदेशातून आल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे.
हरियाणा येथील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा २२ ऑगस्ट २०२२ रोजी गोव्यातील हणजूण येथे खून झाला होता. सुरुवातील नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेले हे प्रकरण फोगाट कुटुंबीयांच्या दबावानंतर खून प्रकरण म्हणून दाखल करण्यात आले होते.
सोनाली यांना एमडीएमए या अमली पदार्थाचा ओव्हरडोस झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवाण यांना अटक करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.