Sonali Phogat: सोनाली फोगट मृत्यू प्रकरण! आरोपी सुखविंदर पाल सिंगचा जामिनासाठी अर्ज

सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.
Sonali Phogat
Sonali PhogatDainik Gomantak

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat Death Case) यांच्या कथित हत्या प्रकरणात संशयित सुधीर सांगवान व संशयित सुखविंदर पाल सिंग यांना अटक करण्यात आली. यापैकी संशयित सुखविंदर पाल सिंग याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर दहा जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.

Sonali Phogat
Goa-Maharashtra: एकही बाटली आणू नका! गोवा मेड दारूवर पोलिसांचा कडक वॉच, थर्टी फर्स्टला जपून राहा

सोनाली फोगट यांच्या कथित हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. म्हापसा जीएमएफसी (Mapusa JMFC) कोर्टाने हे सोनाली फोगट हत्या प्रकरण आता जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केले आहे.

Sonali Phogat
Sunburn: सनबर्नमध्ये भान नव्हे 'मोबाईल' हरवले; अनेक iphone चोरीला, तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात झुंबड

दरम्यान, सीबीआयने फोगट हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रासोबत इतर काही कागदपत्रे (सीसीटीव्ही फुटेज दस्ताऐवज) जोडली आहेत. ही कागदपत्रे आम्हास उपलब्ध करावीत, असा अर्ज संशयितांच्या वकिलांनी वरील जीएमएफसीसमोर केला होता. हा अर्ज संबंधितांकडून शुक्रवारी मागे घेण्यात आला. शुक्रवारी (ता.16) सकाळच्या सत्रात जीएमएफसी कोर्टात हे प्रकरण सुनावणी आले, यावेळी सीबीआयने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील हजर होते. त्याचप्रमाणे संशयित सुधीर सांगवान व संशयित सुखविंदर पाल सिंग यांना कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com