Accident News
AccidentDainik Gomantak

Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Dodamarg Tillari Accident: दोडामार्ग तालुक्यातील तिलारी-शेटवेवाडी रस्त्यावर रविवारी दुपारी दुचाकी व टेंपोच्या झालेल्या समोरासमोर धडकेत कुंब्रल गावातील १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Published on

दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील तिलारी-शेटवेवाडी रस्त्यावर रविवारी दुपारी दुचाकी व टेंपोच्या झालेल्या समोरासमोर धडकेत कुंब्रल गावातील १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.

मृत तरुणाचे नाव राहुल दिलीप वरक (वय १९, रा. कुंब्रल) असे असून, जखमी झालेल्या युवकाचे नाव विठ्ठल देऊ घारे (वय १९, रा. कुंब्रल) असे आहे. दोघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाची अकरा दिवसांची समाप्ती झाल्यानंतर रविवारी सकाळी कुंब्रल गावातील पाच युवक दुचाकींवरून पर्यटनासाठी तिलारी धरण परिसरात गेले होते. दिवसभर मौजमजा करून दुपारी चारच्या सुमारास सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी राहुल वरक हा दुचाकी चालवत होता तर विठ्ठल घारे मागे बसला होता.

Accident News
Arpora: भटक्या गुरांची झुंज, दुचाकीला बसली जोरदार धडक; हणजूणच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

तिलारी-शेटवेवाडी येथील एका तीव्र वळणावर दुचाकीवरील राहुलचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या टेंपोला दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात राहुल वरक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह पोलीस पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तर विठ्ठल घारे याला स्थानिकांच्या मदतीने तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Accident News
Borim Accident: बोरीत काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक, 6 जण जखमी; 12 वर्षीय मुलीचा समावेश

या अपघातामुळे कुंब्रल गावात शोककळा पसरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी राहुलचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशोत्सव संपताच मित्रमंडळींनी आनंदी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या या सहलीचा दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून टेंपो चालकाचीही चौकशी सुरू आहे. ग्रामीण भागातील वळणदार रस्त्यांवरील वेग नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com