Sonali Phogat Case
Sonali Phogat Case  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case: सुखविंदर सिंगच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या कथित हत्या प्रकरणात संशयित सुधीर सांगवान व संशयित सुखविंदर पाल सिंग यांना अटक करण्यात आली. यापैकी संशयित सुखविंदर पाल सिंग याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली.

सोनाली फोगट यांच्या कथित हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. संशयित आरोपी सुखविंदर सिंगच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने तहकुब केली आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. तसेच कोर्टाने सोनाली फोगटच्या भावाला जामीन अर्जात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली आहे.

मागील सुनावणीवेळी म्हापसा जीएमएफसी कोर्टाने सोनाली फोगट हत्या प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. दरम्यान, सोनाली फोगट हत्याप्रकरणी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सहकारी सुखविंदर पाल सिंग यांना 25 ऑगस्टला गोवा पोलिसांनी अटक केली होती. गोवा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास हा सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) केला जात आहे. सीबीआयने सोनाली फोगट हत्याप्रकरणी न्यायालयात 2,500 पेक्षा जास्त पानी आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये 104 साक्षीदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa Today's Live News Update: फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT