Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणारा 'अग्निष्टोम सोमयाग' नेमका आहे तरी काय?

दैनिक गोमन्तक

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

‘अग्निष्टोम’, ‘अत्यग्निष्टोम’, ‘उक्थ्य’, ‘षोडशी’, ‘वाजपेय’, ‘आप्तोर्याम’ आणि ‘अतिरात्र’, असे सोमयागाचे सात प्रकार मुख्यत्वे करून आहेत. म्हापशात जो सोमयाग होणार आहे, तो ‘अग्निष्टोम सोमयाग’ आहे.

सोमयागाच्या कालावधीवरूनही त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. किती दिवस, महिने सोमयाग चालणार आहे, त्यावरूनही त्याचे प्रकार व उपप्रकार आहेत. ‘एकाह’ नामक सोमयागाचा प्रकार आहे, जो फक्त एकाच दिवसाचा असतो. अर्थात तो खूपच लघू प्रकार आहे, पण त्यामानाने त्यासाठी करावी लागणारी तयारी व विधी यांचा ताळमेळ बसत नाही. दोन ते बारा दिवस चालणार्‍या सोमयागाला ‘अहोन’ म्हणतात.

तेरा दिवस ते महिनाभर किंवा जास्तीत जास्त दोन महिने चालणार्‍या सोमयागाला ‘सत्रयाग’ म्हणतात. त्याहीपेक्षा अधिक कालावधीचे म्हणजे सहा महिन्यांपासून ते दोन ते तीन वर्षांपर्यंत चालणारे सोमयागही असतात, ज्याला ‘दीर्घसत्र याग’ म्हणतात.

याशिवाय आणखी काही प्रकार आहेत, ज्याची विभागणी मंत्र आणि तंत्रया दृष्टिकोनातून केलेली असते. ‘अग्निष्टोम’, ‘अत्यग्निष्टोम’, ‘उक्थ्य’, ‘षोडशी’, ‘वाजपेय’, ‘आप्तोर्याम’ आणि ‘अतिरात्र’, असे सात प्रकार मुख्यत्वे करून आहेत. म्हापशात जो सोमयाग होणार आहे, तो ‘अग्निष्टोम सोमयाग’ आहे.

सोमयागाचे प्रकार आपण थोडक्यात पाहिले, आता इतर आवश्यक गोष्टींविषयी जाणून घेऊ. सोमयागाला भूमी शुद्ध आणि मोठी लागते. हातभर यज्ञकुंडासाठी आणि गुरुजींना बसण्यासाठी थोडी जागा असली म्हणजे झाले, असे होत नाही.

यज्ञभूमीचा परिसर एवढा मोठा असावा की, त्यात अग्निहोत्री दांपत्यासाठी झोपडीही मावली पाहिजे. चार दारे असलेला मोठा मंडप, त्याची अंतर्गत रचना व एकूण मांडणी व्यवस्थित होईल, एवढी मोठी जागा लागते. यजमान पती-पत्नीला राहण्याची व्यवस्थाही करावी लागते. तसे त्यांनी तिथेच राहण्यामागेही विशिष्ट कारण आहे. ते म्हणजे या दांपत्याला ‘यज्ञदीक्षा’ किंवा ‘अग्निदीक्षा’ घ्यावी लागते.

यजमान स्वत:ला अग्निस्वरूप समजतो. तो स्वत:मध्येच अग्नी चेतवतो. आपल्या शरीरातला चेतवतो या अर्थाने नव्हे तर, आपल्या शरीरातील आत्मा हाच अग्नी आहे, अशी त्याची स्थापना करतो, या अर्थी ते चेतवणे आहे.

‘राम होऊनी राम गावे’ या उक्तीप्रमाणे राम कळण्यासाठी स्वत: राम व्हावे लागते किंवा संत सांगतात त्याप्रमाणे देवाला बाहेर शोधता शोधता तो आपल्या आतच सापडतो, तद्वत अग्नीचा शोध लावता लावता, माझ्या आतच अग्नी आहे, असा अग्निहोत्रीला शोध लागतो. स्वत: अग्नीरूप होण्याची दीक्षा म्हणजे अग्निदीक्षा.

ही अग्निदीक्षा घेतल्यानंतर स्नान करता येत नाही. जास्तीत जास्त हात किंवा पाय धुवायला मिळतात. पण, सचैल स्नान अजिबात करता येत नाही. आता इथे एक महत्त्वाची अडचण येते. यज्ञयाग काळात शौचाला जावे लागले, तर स्नान केल्याशिवाय पुढील विधीच करता येणार नाहीत.

मग, कसे करायचे? या अग्निहोत्री दांपत्याला शौचाला जावेच लागू नये अशी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे, जितके दिवस हा सोमयाग चालेल तितके दिवस यजमान पती-पत्नी यांना काही खाताच येत नाही. तितके दिवस अन्न न खाता राहणे हीच मोठी कसोटी आहे.

याग सुरू करण्यापूर्वी आठ ते पंधरा दिवस यजमान पती-पत्नी आपले खाणे कमी कमी करत येतात व यागाच्या दिवसापासून पूर्णपणे बंद करतात. एकदा अग्निदीक्षा घेतली की, मग फक्त द्रव पदार्थावर राहावे लागते. द्रव पदार्थही असेच निवडावे लागतात की, ज्यायोगे मल तयार होणार नाही.

लघुशंकेला जाण्यास हरकत नसते, कारण त्यानंतर पाय धुतले की भागते, शास्त्रानुसार आंघोळ करावी लागत नाही. पण, या सगळ्या आहार-नियमनाचा परिणाम शरीरावर होतो. काहीही झाले तरी यजमान पती-पत्नीला यज्ञभूमी सोडून बाहेर जाता येत नाही.

खाणे नाही, आंघोळ नाही यामुळे शरीराला खाज आली तर ती नखांनी खाजवताही येत नाही. त्यासाठी टोकदार नसलेले शिंग वापरावे लागते. किमान प्रत्यक्ष यज्ञ करताना तरी हरीण किंवा काळविटाचे चर्म परिधान करावे लागते.

सोमयाग, त्याचे प्रकार, पद्धत आणि व्रताचरण आपण पाहिले. सोमयागाचे यजमान होणे आणि तो यशस्वीपणे पूर्ण करणे हे किती कठीण कर्म आहे, हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेल. सोमवल्ली आणि सोमयाग या विषयी आपण पुढील भागात जाणून घेऊ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT