Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Social Midea Viral Video: तुम्हीही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर दररोज अनेक व्हायरल व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येत असतील.
Social Midea Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Social Midea Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. येथे दर काही मिनिटांनी नवीन व्हिडीओ (Short Videos) पोस्ट होतात आणि लोक ते खूप आवडीने पाहतात. यामुळेच सोशल मीडियावर लोकांचा मोठा वावर दिसतो. तुम्हीही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर दररोज अनेक व्हायरल व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येत असतील. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Social Midea Viral Video
रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजीबाई (Grandmother) घरात असलेल्या एका फ्रिजजवळ (Fridge) जाते. त्या फ्रिजचा दरवाजा उघडते आणि सुरुवातीला ती असे का करत आहे, हे कोणालाच समजत नाही. पण, पुढच्याच क्षणी आजीबाई असा काही 'स्वॅग' (Swag) दाखवतात की व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. नेमके काय घडते तर, आजीबाई फ्रिजचा दरवाजा उघडून, तिथेच खाली चटई अंथरुन (Mat) झोपून जाते. अंगाची होत असलेल्या लाहीपासून वाचण्यासाठी असा अनोखा जुगाड करताना तुम्ही कदाचित यापूर्वी कोणालाही पाहिले नसेल. याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Social Midea Viral Video
Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ 'Jeejaji' नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 9 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहिल्यानंतर युझर्संनी (Users) वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने कमेंट करताना लिहिले, "आजी आता पंख्याची (Fan) काय गरज आहे!" दुसऱ्याने लिहिले, "आजीबाईचा स्वॅगचा वेगळा आहे." तर, अनेकांनी हसण्याचे, आश्चर्यचकित होण्याचे इमोजी (Emoji) वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com