IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Shubman Gill Wicket: टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने फलंदाजी करताना अशी चूक केली, ज्याचा टीम इंडियाला (Team India) मोठा फटका बसू शकतो.
Shubman Gill Out
Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर (Oval Ground) सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) फलंदाजी करताना अशी चूक केली, ज्याचा टीम इंडियाला (Team India) मोठा फटका बसू शकतो. या कसोटी सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरली.

गिल रन-आऊट, भारताला धक्का

दरम्यान, पहिल्या सत्राचा खेळ पावसाने (Rain) थांबवला तेव्हा भारताने 2 गडी गमावून 72 धावा केल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार गिल अवघ्या 15 धावांवर खेळत होता. पाऊस थांबल्यानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला, तेव्हा गिलने चांगली सुरुवात केली. मात्र, एक धाव घेण्याच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला. आपल्या चुकीमुळे गिलने इंग्लंडला (England) आयती विकेट 'गिफ्ट' (Gift) दिली. गिलची ही चूक भारतासाठी (India) किती महागात पडू शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे. गिल आऊट झाल्यानंतर गौतम गंभीर चिडलेला पाहायला मिळाला.

Shubman Gill Out
IND vs ENG: शुभमन गिलचा डबल धमाका! 59 वर्ष जुना रेकॉर्ड मोडून रचला इतिहास; टीम इंडियाचा 'प्रिन्स' बुलेट ट्रेनसारखा सुस्साट

टीम इंडियाच्या पहिल्या डावात 28 व्या षटकाची सुरुवात झाली, तेव्हा इंग्लंडकडून गस एटिंकसन (Gus Atkinson) गोलंदाजीसाठी आला. गिलने या षटकातील पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव घेतली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने हलक्या हाताने चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. त्याचवेळी, एटिंकसनने लगेच चेंडू पकडून स्टम्पवर मारला. 35 चेंडूंमध्ये 21 धावा करुन गिल रन-आऊट (Run Out) झाला.

Shubman Gill Out
IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

गिल दुसऱ्यांदा रन-आऊट; शतकाची मालिका खंडित

गिल आपल्या कसोटी कारकिर्दीत (Test Career) आतापर्यंत 37 सामने खेळला असून, तो दुसऱ्यांदा रन-आऊट झाला आहे. यापूर्वी, तो गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत रन-आऊट झाला होता. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत गिल पहिल्यांदाच 20 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर शतक झळकावण्यात अपयशी ठरला. या मालिकेतील त्याच्या यापूर्वीच्या सर्व डावांमध्ये, जेव्हाही त्याने 20 धावांचा टप्पा ओलांडला, तेव्हा त्याच्या बॅटमधून शतक आले होते. गिलच्या या रन-आऊटने टीम इंडियाला (Team India) सुरुवातीलाच धक्का बसला असून, पुढील फलंदाजांवर अधिक जबाबदारी आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com