Som Yag Yadnya 2023: नित्य अग्निउपासना केल्याने होणारे पाच फायदे

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (एमडी आयुर्वेद)

नित्य अग्निउपासनेच्या माध्यमानतून प्रत्येक जीवाचे कल्याण साधत अभ्युदयापासून निश्रेयसापर्यंतचा प्रवास पूर्ण करता येतो. नित्य अग्निहोत्र आचरणाने सोमनस्य अर्थात मन:शांती प्राप्त होते. -परमसद्‍गुरू

श्री गजानन महाराज

अन्नाभ्दवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाभ्दवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भव॥

भगवत् गिता 3/14

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अन्नाच्या उर्जेमुळे जीवसृष्टी जीवित राहते. योग्य ऋतू कालचक्र असल्याने पुष्टीकारक व जीवदायी अन्नाची उत्पत्ती होते. सृष्टीचक्र सुचारु रुपाने चालावे यासाठी यज्ञ केले जातात, म्हणूनच नित्य अग्निउपासना करणे गरजेचे आहे.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: सोमयाग म्हणजे काय?

प्राचीन ऋषींनी वेद प्रतिपादीत यज्ञ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक अत्यंत बलशाली व उर्जावान समाज विकसित केला होता. भारतीय इतिहासात असे दिसून येते की, थोर सम्राटांनी महासोमयागा सारख्या वैदिक यज्ञाचे आयोजन केले होते.

भगवान श्रीराम व भगवान श्रीकृष्णाने देखील अश्वमेध व राजसुय यासारखे महायज्ञ आयोजित केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या यज्ञांच्या नित्य आयोजनामुळे पवित्र वातावरण, उत्तम आरोग्य व आत्मबल प्राप्त केलेला एक सामर्थ्यवान समाज निर्माण करणे शक्य झाले असावे.

यज्ञीय जीवन पद्धतीच्या निर्माण अनुसरणामुळे प्राचीन संस्कृतीचा उगम झाला असावा व समाजाने सांसारिक तथा आध्यात्मिक उदंड ऐश्वर्य प्राप्त केले असावे.

ह्याच सामर्थ्याच्या जोरावरती आज पुनश्च एकवार याच अतिप्राचिन तंत्रज्ञानाच्या सहायाने संपूर्ण समाजातील ग्लानी, औदास्य, अनारोग्य, पिडा व दुर्भिक्ष्य दुर करुन परत एकदा तोच वैभवशाली समाज, तीच उन्नत संस्कृती व ते जागतीक साम्राज्य प्रस्थापित करता येते.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: व्यसनमुक्ती ते कृषी क्षेत्र; अग्निहोत्राचे १० फायदे जाणून घ्या

याच प्राचिन संस्कृतीमध्ये मुक्त विचार, समता, कला-संवर्धन, वैज्ञानिक दृष्टीकोन, परोपकरारी वृत्ती अशा उच्चतर विचारांचा समाज निर्माण झाल्याचे दिसून येते. आपल्या कुटूंबामध्ये रोज सुर्योदय-सुर्यास्ताला अग्निहोत्र केल्याने सोमयागाचे सर्व लाभ रोज आपण प्राप्त करु शकतो.

सर्वात पहिला लाभ म्हणजे मनावरील ताण-तणाव कमी होऊन मन प्रसन्न व विचारांमध्ये स्पष्टता प्राप्त होते. घरातील वातावरण पवित्र होऊन सर्व कुटूंबातील व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होतो.

आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील अशा प्रकारच्या होमांचा उल्लेख सापडतो. ज्यामध्ये मंत्रोच्चारपूर्वक औषधी वनस्पतींच्या ज्वलनाने शरिराला व्यांधीपासून मुक्त करता येते असे म्हटले आहे. त्याला ''भ्येषज्य याग'' असे म्हटले आहे.

भ्येषज्य म्हणजे औषध व याग म्हणजे होम किंवा यज्ञ विविध व्याधींवर विशिष्ट संस्कृत मंत्राच्या उच्चारणाबरोबर औषधी वनस्पतींच्या रसाचे व दुध, तुप इत्यादी ज्वलन केल्याने व्याधी हरण करता येते. असे अथर्ववेदामध्ये देखील उल्लेख सापडतात.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणाऱ्या यज्ञ उत्सवाची ६ वैशिष्ट्ये माहितीये का?

ज्वलनामुळे औषधी वनस्पतींमधील घटक द्रव्य शरिरास सहज घेता येतील अशा सुक्ष्म पद्धतीमध्ये उपलब्ध होतो. ऋग्वेदामध्ये यज्ञाच्या बरोबर सेंद्रीय व नैसर्गिक पद्धतीने कृषि करण्याचे संदर्भ सापडतात.

वृक्षायुर्वेद नावाच्या ग्रंथामध्ये होमांच्या बरोबर वनस्पती लागवड केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. यज्ञीय वातावरण व यज्ञीय भस्माच्या सहाय्याने पिकसंवर्धन व उत्तम अन्न निर्मितीस मदत होते.

अनेक प्राचिन ग्रंथामधून यज्ञीय भस्म व पंचगव्य कृषिचे वा वैदिक नैसर्गिक कृषिचे संदर्भ मिळतात. प्राचिन काळी गुरुकुलांमध्ये रोजचे अध्ययन वर्ग सुरु होण्याआधी अग्निहोत्र केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. यज्ञीय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती सकारात्मक परिणाम होऊन त्यांना शिक्षणामध्ये सुलभता निर्माण झाल्याचे देखील सांगितले जाते.

श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् |

आयुष्यं तेज: आरोग्यं देहि मे हव्यं वाहनाम् ॥

अग्निहोत्राच्या आचरणाने आम्हांस बुद्धी, तेज, बल, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त करुन देतो.

अग्निउपासनेच्या माध्यमातून पृथ्वीवरच स्वर्गवत जीवन निर्माण करता येऊ शकते.

(लेखक हे गुरुमंदिर,बाळाप्पा मठ, अक्कलकोट व विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि श्री गजानन महाराज, शिवपुरी, अक्कलकोट यांचे नातू आहेत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com