IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

KL Rahul Record: राहुलने सलामीवीर म्हणून कमालीचा संयम दाखवला, तसेच आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच असा एक मोठा पराक्रम केला.
KL Rahul Record
KL Rahul Dainik Gomantak
Published on
Updated on

KL Rahul Record: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली, तेव्हा केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोनच असे खेळाडू होते, ज्यांना इंग्लंडमधील परिस्थितीत सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव होता. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर मोठी जबाबदारी होती आणि त्यांनी आपल्या कामगिरीने चाहत्यांना निराशही केले नाही. राहुलने सलामीवीर म्हणून कमालीचा संयम दाखवला, तसेच आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच असा एक मोठा पराक्रम केला, जो त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता.

राहुलचा चमत्कार

दरम्यान, केएल राहुलसाठी (KL Rahul) इंग्लंडचा हा दौरा त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात खास ठरला. ओव्हलमध्ये (Oval) खेळल्या जात असलेल्या या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात राहुल 40 चेंडूंचा सामना करुन 14 धावा काढून बाद झाला. मात्र, पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एक मोठा पराक्रम नक्कीच केला.

KL Rahul Record
IND vs ENG: शुभमन गिलचा डबल धमाका! 59 वर्ष जुना रेकॉर्ड मोडून रचला इतिहास; टीम इंडियाचा 'प्रिन्स' बुलेट ट्रेनसारखा सुस्साट

कमाल कामगिरी

  1. दोन शतकी खेळी: राहुलने या मालिकेत आतापर्यंत 2 शतकी खेळी (Two Centuries) केल्या.

  2. 500 हून अधिक धावा: त्याच्या बॅटमधून 500 हून अधिक धावा (More than 500 Runs) निघाल्या आहेत.

  3. 1038 चेंडूंचा सामना: त्याने या कसोटी मालिकेत एकूण 1038 चेंडूंचा (1038 Balls) सामना केला.

एकाच कसोटी मालिकेत एकाच वेळी हे तिन्ही पराक्रम करण्याची ही राहुलच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ आहे.

KL Rahul Record
IND vs ENG: ओव्हल टेस्टवर पावसाचं सावट? हवामान बिघडवणार खेळ? जाणून पाचही दिवसांचा वेदर रिपोर्ट

दुसऱ्या डावात गावस्करांचा विक्रम मोडण्याची संधी

भारतीय संघाकडून इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये 15 कसोटी सामने खेळताना 14.14 च्या सरासरीने एकूण 1152 धावा केल्या आहेत.

केएल राहुलने आतापर्यंत इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून 13 कसोटी सामन्यांमध्ये 1122 धावा केल्या आहेत. त्यामुळे ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात राहुलकडे गावस्कर यांचा हा विक्रम मोडण्याची संधी असेल, कारण तो या विक्रमापासून केवळ 31 धावा दूर आहे.

राहुलच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याची एक मजबूत जागा निर्माण झाली असून, दुसऱ्या डावात तो गावस्कर यांचा विक्रम मोडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com