महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Alcohol smuggling in Goa: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीतील टिप्पणीसाठी ओळखले जातात, अधिवेशनापूर्वी यांनी माध्यमांशी बोलताना मिश्किलपणे सरकारची फिरकी घेतली
Vijay Sardesai on alcohol smuggling
Vijay Sardesai on alcohol smugglingDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोवा विधानसभेच्या अधिवेशनात काही दिवसांपूर्वी धारगळ येथील दारूच्या ट्रकने पेट घेतल्याने गोव्यातील अवैध दारू तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या प्रकरणी गुरुवारी (दि. ३१) पुन्हा एकदा चर्चा झाली, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीतील टिप्पणीसाठी ओळखले जातात, अधिवेशनापूर्वी यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा मिश्किलपणे सरकारची फिरकी घेतली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरदेसाईंची मिश्कील फिरकी

अधिवेशनाच्या पहिल्या सत्राआधी माध्यमांशी संवाद साधताना आमदार विजय सरदेसाई यांनी, दारूबंदी असलेल्या गुजरात राज्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, "गांधीजी म्हणाले होते दारू सोडा, पण गुजरातमध्ये मात्र अजूनही दारू आणि सोडा दोन्ही विकलं जातंय." या मिश्किल वाक्यातून त्यांनी दारूबंदी असूनही अवैध विक्री कशी होते यावर भाष्य केलं.

धारगळ येथील ट्रक अपघातानंतर चालक आणि इतर कर्मचारी पळून गेले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. यावर प्रतिक्रिया विचारल्यावर सरदेसाई म्हणाले की, "या प्रकरणात उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक आहेत, त्यामुळे आपण वाट पाहिली पाहिजे."

अवैध तस्करीवर मुख्यमंत्र्यांची गंभीर भूमिका

याआधी, याच प्रकरणी आमदार वेंझी व्हिएगस आणि विजय सरदेसाई यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते. आमदार व्हिएगस यांनी, "गोव्यात दारूचे वैध वितरक असतानाही अवैध दारूची तस्करी कशी होते?" असा रोखठोक सवाल विचारत सीमाशुल्क विभागाच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते.

Vijay Sardesai on alcohol smuggling
Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

"या दारूचा स्रोत निश्चित झाल्यावर संबंधित कारखाना जप्त केला जाईल, त्यांचा परवाना रद्द केला जाईल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित निरीक्षकाला त्याच्या कामात चूक आढळल्यास निलंबित केले जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com