Som Yag Yadnya 2023 Gomantak Digital
गोवा

Som Yag Yadnya 2023: असा पार पडला ५ वा दिवस, शुक्रवारी यज्ञाची सांगता

गोमन्तक वृत्तसेवा

Som Yag Yadnya 2023 Goa

म्हापसा : निरनिराळ्या सूक्तांच्या सामगायनाने झालेले भक्तिमय वातावरण आणि एक हजारहून भाविकांची गर्दी... महासोमयाग अग्निष्टोमयागाच्या पाचव्या दिवशी असे चित्र होते. काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात सुरू असलेल्या यज्ञ उत्सवाचा गुरुवारी पाचवा दिवस होता. शुक्रवारी अवभृत स्नानाने (नदीकाठी स्नान) या यागाची सांगता होणार आहे.

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे विश्वशांतीसाठी अग्निष्टोम महासोमयाग करण्यात आला आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यज्ञ उत्सवाची शुक्रवारी सांगता होणार आहे. मागील पाच दिवसांपासून महासोमयागास भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला. गुरुवारी यज्ञस्थळी अग्निदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. परदेशातून आलेले पर्यटकही या यज्ञ उत्सवात आले होते. भारतीय संस्कृती, यज्ञसंस्था याविषयी त्यांनी जाणून घेतले. याशिवाय माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनीही यज्ञस्थळी भेट दिली.  

पाचव्या दिवसाचं महत्त्व काय?

अग्निष्टोम सोमयागाच्या पाचव्या दिवसाला सूत्याह असे म्हणतात. प्रात:सवन, माध्यंदिन आणि सायंकाळ अशा तीन सत्रात पाचवा दिवस पार पडला. प्रात: सवनात इंद्र आणि वसू गण यांच्याकरिता सोम आहुती देण्यात आली. माध्यंदिन सवन यात इंद्राकरिता तर सायंकाळ सवनात इंद्र, ऋभू आणि अन्य गणांकरिता आहुती देण्यात आली. होतृगण (मंत्र पठण करणारी ऋग्वेदी मंडळी) देवतांना आवाहन करतात आणि होमाच्या वेळी मंत्र म्हणतात. कोणत्याही चुका झाल्या असतील तर त्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी यज्ञ पार पडला. मनुष्यमात्रात दोष किंवा चुका होण्याची शक्यता असते. त्यासाठी हा यज्ञ केला जातो. आता शुक्रवारी यज्ञाची सांगता होईल.

वेदकालीन संस्कृतीचे दर्शन

सोमयाग यज्ञामुळे वेदकालीन संस्कृतीचे दर्शन घडले. यज्ञस्थळी प्रसन्न व मंगलमय वातावरण आहे. या यज्ञाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही लोक पाहतात. या यज्ञाचा गोमंतक भूमीला नक्कीच लाभ होईल. यज्ञस्थळी उपस्थित राहिल्याने सर्वांनाच ऊर्जा मिळाली. विश्वशांतीसाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे.
- रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री

समाज गुण्यागोविंदाने नांदावा

गोमन्तक-सकाळ माध्यम समूह विश्वशांतीसाठी महासोमयागाचे आयोजन करते, ही कौतुकास्पद बाब आहे. सध्या पर्यावरण सांभाळून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. समाज गुण्यागोविंदाने नांदावा, यासाठी हा यज्ञ आहे. त्यामुळे गोमन्तक-सकाळला या आदर्श कार्याच्या निमित्ताने गोमंतकीयांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT